सोनीचा हा कॅमेरा १० लाखांत १..!
चकित होऊ नका. कारण जगात अनेक कॅमेरे 35 ते 45 लाखांत सुद्धा मिळतात. पण हा कॅमेरा खरंच युनिक आहे. त्याचं झालं असं की, थायलंड चे श्री. थिरा सुरियावाँग्से यांनी काही दिवसापूर्वी Sony कंपनीचा alpha 6400 कॅमेरा विकत घेतला. घरी येऊन अनबॉक्स केला आणि कॅमेरा बघून त्यांना आश्चर्याचा झटकाच बसला. कारण 6400 च्या बॉक्स मध्ये 6300 कॅमेरा निघाला!





हा घोटाळा लक्षात आल्यावर त्यांनी तडक Sony चे शोरुम गाठले. ज्या सेल्समन कडून त्यांनी तो कॅमेरा खरेदी केला होता त्याला त्यांनी ही हकीकत सांगितली. त्याने कंपनीकडे संपर्क केला आणि तो कॅमेरा श्री. थिरा सुरियावाँग्से यांना बदलून देण्यात आला. कंपनीने ही ‘one in a million’ म्हणजेच ‘ दहा लाखांत एक ‘ केस आहे असे स्पष्टीकरण दिले!




©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.