जगातील सर्वात मजबूत आणि फास्टेस्ट SD कार्ड..
Sony ने नुकताच SF-G सिरीज चा UHS-II हा आजपर्यंतचा सर्वात मजबूत आणि फास्टेस्ट कार्ड सादर केला आहे. स्टॅंडर्ड कार्ड पेक्षा हा कार्ड 18 पटीने अधिक मजबूत आहे. ही मजबुती मोनोलिथिक बॉडी आणि 100% सील्ड सिमलेस मोल्डींग मुळे शक्य झाली आहे.

Sony
सिमलेसली सील्ड बॉडी मुळे कार्ड डस्ट प्रुफ आणि वाटरप्रूफ बनले आहे. मोनोलिथिक रिब मुळे ह्या कार्डला मजबुती मिळाली आहे.

Sony
विषम वातावरणात काम करणाऱ्या एक्स्ट्रीम फोटोग्राफर्सना हे कार्ड वरदान ठरणार आहे.

Sony
केवळ मजबुतीच नाही, तर हे कार्ड सर्वाधिक फास्ट असल्याचा दावा देखील Sony ने केला आहे. (300MBPS)
ह्या कार्डची विक्री ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. 32GB क्षमता असलेल्या कार्डची किंमत अदाजे 6000 रुपये तर 128GB क्षमता असलेले कार्ड अंदाजे 20000 रुपये किमतीचे असल्याचं बोललं जातंय. भारतात ह्या कार्डच्या आगमनाची प्रतीक्षा जरा अधिक करावी लागेल ह्यात शंका नाही.
© सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.