अहमदनगर आणि भोवताली असलेले प्रमुख प्रीवेडिंग फोटोशूट डेस्टिनेशनस्
नगर शहराच्या आसपास प्रीवेडिंग फोटोशूट करायची आहे? पण लोकेशन ही एक मोठी समस्या आहे? जाणून घ्या काही नगर शहराच्या आसपास असलेल्या प्रमुख प्रीवेडिंग फोटोशूट डे्टिनेशनस् विषयी नगरच्या फोटोग्रार्स कडून..
१. Down Hill Supa (सुप्याच्या अलीकडील उतारालगतची टेकडी)
नगरच्या अनेक लोकेशन्स पैकी वेडिंग फोटोग्राफर शशांक इस्सर ह्यांचे आवडते लोकेशन. शशांकच्या मते हे लोकेशन जरी पुणे नगर हायवे लगत असले तरी अगदी शांत, आणि शहरी गर्दी पासून दूर आहे. नैसर्गिक वैविध्याने संपन्न अशा ह्या लोकेशन मध्ये तुम्हाला गवत, झाडी, हिरवळ, टेकडी, तलाव हे सर्व एकाच ठिकाणी मिळते. कधी तरी हरणांचा कळप देखील दिसतो. हे लोकेशन जरी सहसा निर्जन असले तरी ते सुरक्षित आहे.
२. बारदरी
गर्भगिरी च्या रंगामध्ये वसलेलं हे छोटंसं रत्न. राजेंद्र गायकवाड यांचं आवडतं ठिकाण. शहरापासून जवळ पण शहरी वातावरणापासून दूर. नगरी भाषेत बोलायचं झालं तर एकदम निवांत! काही लोकेशन्स अगदीच तुटक असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्यम स्वरूपाचे.