fbpx

Grey मार्केट, डुप्लिकेट माला विरूद्ध सजग फोटोग्राफर्स 1

भारतातील बहुतांश कंपन्या grey मार्केट, डुप्लिकेट माला विरूद्ध सतत झुंजत आल्या आहेत. Grey मार्केट, डुप्लिकेट मालाचे तोटे ग्राहकांना वेळोवेळी समजावून सांगण्यात येत होते. पण genuine कॅमेरे आणि grey मार्केट, डुप्लिकेट कॅमेऱ्याच्या किमतीत असलेल्या मोठ्या तफावती मुळे फोटोग्राफर्सचा कल grey मार्केट किंवा डुप्लिकेट कॅमेऱ्यां कडे अधिक होता. आता परिस्थिती बदलत चालली आहे. हल्लीच्या सुशिक्षित आणि प्रशिक्षित फोटोग्राफर्सना genuine उत्पादनांचे फायदे कळू लागले आहेत. इंटरनेट क्रांती आणि विविध फोटोग्राफर असोसिएशन, कंपन्यांनी ह्यकामी केलेली जागरूकता ह्यामुळे grey मार्केट, डुप्लिकेट उत्पादनांना चाप बसत आहे.

काय आहे grey मार्केट?

Grey मार्केट म्हणजे एखाद्या कंपनीचा माल, त्यांच्या अधिकृत इम्पोर्टर द्वारे न मागविता, अन्य देशांतून अनधिकृत हस्तकांमर्फत सर्व कर चुकवून आयात केले जातात. उदाहरणार्थ भारतात Nikon कंपनीचा अधिकृत इम्पोर्टर Nikon India Pvt Limited, तर Canon साठी Canon India Pvt Limited ह्या कंपन्या अधिकृत इम्पोर्टर आहेत.

Grey मार्केटच्या नावाखाली कशी होते फसवणूक?

1. grey मार्केट माला चे सर्व व्यवहार रोखीने होतात, त्या व्यवहाराचा कुठलाही लेखी पुरावा नसतो. ह्या गोष्टीचा फायदा घेऊन काही विक्रेते grey च्या नावाखाली हुबेहूब ओरिजनल सारखी पॅकिंग असणारा डुप्लिकेट किंवा रिफर्बिश्ड (जुने स्पेयर पार्टस नव्या बॉडी मध्ये असेंबल करून बनविलेले) कॅमेरे विकतात.

2. grey मार्केट प्रोडक्ट हे अन्य देशांच्या तांत्रिक परिस्थितीनुसार बनविलेले असतात. उदा. युरोप आणि भारताचे इलेक्ट्रिक नॉर्म वेगळे आहेत. युरोपचा कॅमेरा भारतात व्यास्थित चालेल ह्याची खात्री नाही.

3. grey मार्केट उत्पादनांना कुठलीही वॉरंटी अथवा गॅरंटी मिळत नाही.

4. कंपन्यांनी सुरू केलेल्या बऱ्याचशा स्कीम, प्रोग्रॅम्स ला grey मार्केट वापरकर्ता मुकतो.

5. काही विक्रेते grey मार्केट कॅमेरा genuine म्हणून विकतात, त्याचे खोटे बिल देखील देतात.

कंपन्या grey मार्केटच्या विरोधात काय करत आहेत?

Canon कंपनीने अलीकडेच Canon Elite Club ह्या प्रोग्रॅम ची सुरुवात करून grey मार्केट विरुद्ध लढा पुकारला आहे. ह्या प्रोग्रॅम अंतर्गत ज्या फोटोग्राफरने फुलफ्रेम कॅमेरा विकत घेतला आहे त्याला ₹ 62499.00 पर्यंतचे gifts घरपोच मोफत मिळणार आहेत. ज्यांनी 5 ते 10 हजार वाचविण्या साठी genuine कॅमेरे घेतले नाहीत ते आज ह्या संधीस मुकले आहेत. तसेच Canon कंपनीने नकली माल रिपोर्ट करण्यासाठी एक वेबपेज सुरू केले आहे.

Nikon ने काही दिवसांपूर्वी ‘Say No to Grey‘ नावाचा उपक्रम सुरू केला आहे, ज्यात ते ग्राहकांना grey मार्केटचे तोटे समजावून सांगत आहेत. त्यांनी त्याकरिता एक पेज सुरु केले आहे. ग्राहक तिथे जाऊन आपल्या कॅमेऱ्याचे सीरियल नंबर टाकून आपला कॅमेरा genuine आहे की नाही ह्याची शहानिशा करू शकतो.

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close