fbpx

लेजर युग: कॅमेऱ्याला धोकादायक Leave a comment

हल्ली कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी विविध प्रकाश रचनांचा वापर केला जातोय. भरीला लेजर लाईट देखील येत आहेत. परंतु या लेजर लाईट्स कॅमेरा सेन्सर वर पडताच कॅमेरा सेन्सर खराब होतो. याची अनेक उदाहरणे आपण पूर्वी बघितली असतील. काहींनी प्रत्यक्ष अनुभवली देखील असतील!

मोबाईल कॅमेऱ्याच्या वाढत्या वापरामुळे आयोजक सुशोभीकणासाठी हल्ली लेजर लाईट वापरणे टाळतात. पण त्यामुळे लेजर किरणांचा धोका टळला असे नाही, कारण लेजर तंत्रज्ञानाचा वापर सुशोभीकरणाच्या पलीकडे जाऊन दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक उपकरणांमध्ये होऊ लागला आहे. रिमोट मोबाईल चार्जिंग, ओबस्टॅकल सेंसिंग, खेळणी, ओव्हन सारख्या असंख्य उपकरणांमध्ये लेजर तंत्र वापरले जाते. ड्रायव्हर रहित स्वयंचलित वाहनांमध्ये ओबस्टॅकल सेन्सिंग साठी लेजर तंत्र वापरले जाते. ह्या तंत्राचा पहिला बळी ठरला तो श्री. जीत राय चौधरी यांचा Sony A7 M3.

IIT खरगपूर चे विद्यार्थी असलेले श्री. चौधरी हे अमेरिकेत एका ऑटोमोबाईल टेस्टिंग कंपनीत सीईओ आहेत. एका ड्रायव्हर रहित कारच्या टेस्ट दरम्यान त्यांचा कॅमेरा बिघडला आणि या तंत्राचा संभाव्य धोका लक्षात आला.

विशेष म्हणजे ही किरणं अदृश्य असतात व सहज लक्षात न येण्यासारखी आहेत. आणि यांपासून केवळ डिजिटल कॅमेऱ्यांना धोका आहे असे नाही. तर मोबाईल कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे हे देखील या लेजर किरणांना बळी पडू शकतात. लेजर तंत्रज्ञान हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे, त्याला थांबविणे अशक्य आहे. आता गरज आहे कॅमेऱ्यांना लेजरप्रुफ बनविण्याची. तोपर्यंत आपणच आपल्या कॅमेऱ्यांची काळजी घ्यावी!

© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close