UV फिल्टर: टु हॅव ऑर नॉट टु हॅव..

UV फिल्टर असावे की नसावे हा तसा फोटोग्राफी विश्र्वातील जुना वाद! अगदी अम्याच्युअर फोटोग्राफर पासून प्रोफेशनल फोटोग्राफरला पडणारा हा मोठ्ठा प्रश्न. गेल्या अनेक वर्षंपासून या विषयावर अनेक युक्तीवाद youtube, सोशल मीडियावर किंवा अनेक मेंटर कडून ऐकलेत. त्याबद्दल थोडं..

UV फिल्टर काय हे समजून घेण्यापूर्वी कशासाठी हे समजून घेऊ. कॅमेरा आणि लेन्स यांच्या किमती मधली तफावत बघता तुमच्या हे लक्षात येईल कॅमेरा बॉडी पेक्षाही लेन्सेस ची किंमत अधिक आहे. आणि लेन्सचे किमती अधिक असण्याचे कारण म्हणजे लेन्सेसचे ऑप्टिक्स. लेन्सेस मध्ये वापरण्यात आलेल्या एलिमेंट्स च्या म्हणजेच काचेच्या भागावर काही विशिष्ट कोटिंग्स केलेल्या असतात जेणेकरून काचेवर पडणाऱ्या प्रकाशाने अतिरिक्त इफेक्ट्स तयार न करता समोरची इमेज आहे अशी तयार व्हावी. उदाहरणार्थ बर्‍याचदा काचेवर पडणाऱ्या प्रकाशामुळे इंद्रधनुष्य सारखा इफेक्ट इमेजवर येतो. एलिमेंट्स वर असणार्‍या कोटिंग मुळे अशा प्रकारचे इफेक्ट हे काढून टाकता येतात. या प्रक्रिया केलेल्या एलिमेंट ची किंमत ह्या लेन्सेस ची किंमत जास्त असण्यातला एक महत्वपूर्ण फॅक्टर मानला जातो.

वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळे, धुळीमुळे, आणि प्रदूषणामुळे एलिमेंट्स वर असणाऱ्या कोटींगची झीज होते आणि परिणामतः इमेजची क्वालिटी ढासळते. कधी कधी चुकीच्या हँडलिंग मुळे किंवा लेन्स पडल्यामुळे लेन्सला धोका संभवतो. लेन्स वर डाग किंवा scratch पडण्याची शक्यता वाढते. भारतीय फोटोग्राफर्स ज्या वातावरणात कॅमेरे वापरतात ते लक्षात घेता लेन्सला लग्नात वापरल्या गेलेल्या फुले, अक्षता, गुलाल इत्यादी घटकांपासून देखील धोका संभवतो. या सर्वांपासून लेन्सचे रक्षण करायचे असल्यास त्यावर युवी फिल्टर असणे आवश्यक आहे.

 

युवी फिल्टर कसे निवडाल?

UV फिल्टर निवडताना काही गोष्टींचा विचार करावा

१. फिल्टर साठी वापरण्यात आलेली काच कमीत कमी जाडीची, अतिशय पातळ असावी.

२. काचही सर्व बाजूंनी समतल असावी म्हणजेच अब्सोल्युट झिरो नंबरची असावी. जेणेकरून आपल्या इमेजची साईज, प्रपोर्शन आणि आस्पेक्ट रेशो हा अबाधित राहील.

३. फिल्टर ची काच ही साधी काच नसावी त्या काचेवर देखील एलिमेंट प्रमाणे विविध केमिकल्स अथवा इतर घटकांचे कोटिंग असावे. जेणेकरून फिल्टरद्वारे लेन्स पर्यंत पोहोचणाऱ्या डेटा चा दर्जा हा अबाधित राहील.

या सर्व बाबींमुळे युवी फिल्टर ची किंमत वाढते परंतु जर उच्च प्रतीचे युवी फिल्टर वापरले तर आपल्या किमती उपकरणांचे आयुर्मान देखील वाढते.

आपल्या लेन्सेसचे बाहेरील प्रदूषणा व्यतिरिक्त सूर्याच्या अतिनील म्हणजेच UV किरणांपासून होणाऱ्या इमेज लॉस पासून युवी फिल्टर बचाव करतात.

शेवटी ओरिजनल लेन्स आणि बाहेरून लावलेले फिल्टर याच्या दर्जामध्ये थोडाफार फरक असू शकतो optics दर्जामध्ये असलेल्या फरकामुळे अर्ध्या टक्क्यापर्यंत इमेजच्या दर्जात फरक पडू शकतो पण जर थोड्या खर्चात युवी फिल्टर आपल्या लेन्सचा बचाव करत असेल तर माझ्या मते फिल्टर अवश्य बसवावे.

NiSi आणि Hoya कंपनीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे UV आणि ND फिल्टर हे शार्प इमेजिंग अहमदनगर येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी संपर्क 9404980133

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Sharp Imaging

6 thoughts on “UV फिल्टर: टु हॅव ऑर नॉट टु हॅव..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s