Camera

मुलाखत, माझ्या “मराठीतूनच” मी मराठीतूनच बोलणार

नाशिकचे जगद्विख्यात छायाचित्रकार श्री प्रसाद पवार यांनी अमेरिकेतील भटकंती विषयी प्रसिद्ध अशा Travel Channel ला मराठी भाषेत मुलाखत दिली. कशाविषयी होती ही मुलाखत? प्रसाद पवार हे नाव फोटोग्राफी विश्वात चिरपरिचित आहेच. ते केवळ त्यांच्या अचंभित करणाऱ्या कारकिर्दी मुळे, किंवा जीवनाच्या खडतर प्रवासामुळे नव्हे, तर त्यांच्या कामामुळे! त्यांच्या ह्याच कामा बद्दल ही मुलाखत होती. अजिंठा लेण्यांमधील भित्तीचित्रे, शिल्पकला ही नेहमीच जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत असते. दरवर्षी लक्षावधी पर्यटक अजिंठा लेण्यांना भेट देतात. बदलते वातावरण आणि अन्य काही कृत्रिम क...
Camera

सर्वोत्तम पोर्ट्रेट घेण्याची ट्रिक..

तसे फोटोग्राफीचे अनेक प्रकार आहेत. पण भारतात लग्नातील फोटोग्राफी आणि अन्य प्रकार ह्यात व्यस्त प्रमाण आहे. शंभरातील ९९ लोक हे वेडिंग फोटोग्राफी करतात. आणि त्यातील ९० हे पोर्ट्रेट घेतात. तुमच्या पोर्ट्रेटला जिवंतपणा आणण्याची ट्रिक या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ. डोळे हे मनाचे पट असतात. डोळे मनातील भाव दर्शवितात. डोळ्यांवर फोकस करून, विविध लाईट वापरून, अँगल वापरून आपण सब्जेक्ट च्या मनातील भाव कॅमेऱ्यात टिपू शकतो. अनादी काळापासून भारतीय ऋषींना हे माहीत होतं. कुठल्याही कलेला केवळ कला म्हणून न बघता शास्त्र म्हणून त्या कलेला अद्ययावत केले ग...
Camera

खाजगी असे बरेच काही!

या भारतीय शहरी एकटेपणापेक्षाही ही चित्रे वेगळी आहेत. कारण त्यात फक्त उदास वातावरण नाही, तर त्याही पलीकडे विविध भाव आहेत. पुलाची वैशिष्टय़पूर्ण रचना आणि त्या रचनेआड आपले काही खासगी क्षण व्यतीत करणारे एक जोडपे. त्यांचे केवळ पाय दिसताहेत आणि त्यांनी साधलेली जवळीक. दुसऱ्या एका छायाचित्रात खालच्या बाजूस कॅफे आणि त्याच्यावरच्या खोलीमध्ये एक जोडपे. त्यातील एक जण पहुडलेला, तर एक बसलेला. इथेही दिसतोय तो खासगी क्षणच. तिसऱ्या छायाचित्रामध्ये एक बंद काचेची खिडकी, पलीकडे पिवळ्या रंगछटेच्या प्रकाशामध्ये कदाचित एक व्यक्ती कपडे बदलते आहे, तर कुणी खिडकीत बसून व...
Camera

प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांच्या छायाचित्राची साडेतीन लाखांत विक्री

औरंगाबाद येथील प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांचे एक छायाचित्र नुकतेच लंडन येथील जॉनएलेज स्लेव या पर्यटक रसिकाने साडेतीन लाख रुपयांत विकत घेतले आहे.औरंगाबादच्या तापडिया नाट्यगृहात टिपलेले अस्सल भारतीय नृत्याविष्काराचे हे छायाचित्र आहे. निकम हे २० वर्षांपासून औरंगाबाद शहरात मुक्त छायाचित्रकार म्हणून काम करतात. छायाचित्रणात आगळेवेगळे प्रयोग करणे हा त्यांचा छंद आहे. त्यांनी कल्पकतेने काढलेल्या वेगळ्या छायाचित्रांचे प्रदर्शन काही दिवसांपूर्वी मुंबईत भरवले होते. यात त्यांनी हा काढलेला नृत्याविष्काराचा फोटो होता. किशोर निकम यांनी सांगितले की, दोन...
Camera

खंडेरायाच्या जेजुरीचा हा फोटो ठरला ‘जगातील सर्वोत्तम फोटो’

विकीपीडीयाने आयोजित केली होती महाराष्ट्रामधील अनेकांचे आराध्य दैवत असणाऱ्या खंडेरायाची जेजुरीची ख्याती पुन्हा एकदा जगभरात झाली आहे. यासाठी कारण ठरले आहे जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला टिपलेला फोटो. भंडाऱ्यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो ‘२०१७ सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो’ ठरला आहे. जगभरातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत असलेल्या विकीपिडीयाने आयोजित केलेल्या एका स्पर्धेमध्ये या फोटोने पहिला क्रमांक पटकावला आहे. विकीपीडीयाने #WikiLovesMonuments ही थीम घेऊन जगभरातील व्यक्तींकडून त्यांच्या प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो मागवले होते. ...