Camera

पावसाळा आलाय, आपले कॅमेरे सुरक्षित ठेवा!

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी. सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या...
Camera

DSLR चे बाह्य रचनाशास्त्र (Ergonomics)

प्रथमदर्शनी DSLR दिसायला आणि वापरायला किचकट वाटत असला तरी त्याला अधिकाधिक युजर फ्रेंडली आणि सुटसुटीत बनविण्यासाठी तंत्रज्ञांची, डिझाईनर ची टीम ही सतत प्रयत्नशील असते. तुमचा कॅमेरा कितीही अत्यधूनिक असला, कितीही नवनवे तंत्र त्यात असले तरीसुद्धा जर त्या कॅमेऱ्याचे ergonomics चुकीचे असेल तर तो कॅमेरा तितक्या प्रभावीपणे वापरणे शक्य होणार नाही. DSLR घेताना बाह्य रचानाशास्त्राच्या कोणत्या बाबींचा विचार करावा ह्याबद्दल समजावून घेऊ. 1. बॉडी साइज कॅमेरा बॉडी साईजच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, छोटी पण हातात मावेल इतकी मोठी बॉडी असणे उत्तम. सामान्यतः ग्र...
Camera

हिस्टोग्राम: तुमच्या फोटोग्राफीचा प्रामाणिक समीक्षक

तुम्ही काढलेली छायाचित्रे निश्चितच तुमच्या कॅमेऱ्याने जन्माला घातलेला कलाविष्कार आहे. तरीही फोटोग्राफी या कलेला शास्त्राची जोड आहे. म्हणूनच एका चांगल्या छायाचित्रकाराला साधा कॅमेरा वापरून चांगले फोटो घेता येतील, तसेच एखाद्या नवख्या फोटोग्राफरच्या 5D कॅमेऱ्यातून क्रिस्पी, आणि शार्प फोटोज् डिलिव्हर होतील. पण त्या दोन्हीही ईमेजेस सर्वोत्तम नसतील. तुम्हाला सर्वोत्तम इमेजेस घेण्यासाठी फोटोग्राफीच्या कला आणि शास्त्रात पारंगत व्हावे लागेल. तुमचे कॅमेरे तांत्रिक दृष्ट्या प्रगत, नव्हे अतिप्रगत झाले आहेत. तुम्हालाही त्याच गतीने प्रगती करायला हवी. कितीही ...
Camera

ट्रॅव्हलिंग करताना फोटोग्राफी करायचीय?, जाणून घ्या बेसिक फंडे

आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कैद करण्याचे काम कॅमेरा करत असतो. तरुणाईला तर कॅमेराचे प्रचंड वेड असते. ट्रॅव्हलिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आपण काढत असतो. कॅमेरा हाताळण्याच्या अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याचदा फोटोज चांगले येत नाहीत. म्हणून फोटो काढताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. याविषयीचे काही बेसिक फंडे जाणून घ्या. फोटोग्राफी म्हणजे फक्त सुंदर छायाचित्र काढणेच नाही. कारण, बहूतांश लोक असेच करताना दिसून येतात. काहीच न सांगता खूप काही सांगण्याचा मार्ग म्हणजे फोटोग्राफी. फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण समाज आणि जनतेमध्ये जागरुकता निर्म...
Camera

छायाचित्रणाची आश्वासक सुरुवात

स्मार्टफोनने इतर गॅझेटचे महत्त्व दुय्यम केले, तसेच कॅमेऱ्यांचेही केले. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांचा दर्जा वाढू लागल्यानंतर स्मार्टफोनमधून छायाचित्रे काढण्यावर भर वाढत चालला आहे आणि ते साहजिकही आहे. प्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भूमिका बजावतो. पण म्हणून कॅमेरे अस्तंगत होतील किंवा त्यांची गरज कमी होईल, अशी परिस्थिती नाही. याउलट एकीकडे फोन स्मार्ट बनून कॅमेऱ्यांचे काम करत असताना कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्या ‘स्मार्ट’ कॅमेरे बनवण्यावर भर देऊ लागल्या आहेत. ‘कॅनन’ या आघाडीच्या कंपनीचा ‘ईओएस ३०००डी’ हा कॅमे...
X