Camera

अहो आश्चर्यम! लाव्हामध्ये पडलेला गो प्रो कॅमेरा पुन्हा सापडला आणि….

ज्वालामुखीच्या पोटातून निघालेल्या तप्त लाव्हारसात एखादी वस्तू चुकून पडली तर तिचं काय होईल हे काही वेगळं सांगायला नको. खदखदत्या लाव्हारसातील उष्णतेनं कधी त्याची राख होईल हेही आपल्याला कळणार नाही. पण , नुकताच एका कॅमेरामननं एक आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा कॅमेरा ज्वालामुखीजवळ हरवला होता. हा कॅमेरा कदाचित जळून भस्मसात झाला असेल असं त्याला वाटलं. बऱ्याच दिवसांनी कुतूहलापोटी त्यानं आपला कॅमेरा पाहिला तो अत्यंत चांगल्या अवस्थेत होता. इतकंच नाही तर दरम्यानच्या काळात ज्वालामुखीच्या परिसरसात काय घडलं यांचंही चित्रिकरण या क...
Camera

छायाचित्रणाची आश्वासक सुरुवात

स्मार्टफोनने इतर गॅझेटचे महत्त्व दुय्यम केले, तसेच कॅमेऱ्यांचेही केले. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांचा दर्जा वाढू लागल्यानंतर स्मार्टफोनमधून छायाचित्रे काढण्यावर भर वाढत चालला आहे आणि ते साहजिकही आहे. प्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भूमिका बजावतो. पण म्हणून कॅमेरे अस्तंगत होतील किंवा त्यांची गरज कमी होईल, अशी परिस्थिती नाही. याउलट एकीकडे फोन स्मार्ट बनून कॅमेऱ्यांचे काम करत असताना कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्या ‘स्मार्ट’ कॅमेरे बनवण्यावर भर देऊ लागल्या आहेत. ‘कॅनन’ या आघाडीच्या कंपनीचा ‘ईओएस ३०००डी’ हा कॅमे...
Camera

Canon RF लेन्सेस: फोटोग्राफी विश्र्वातील नवा आविष्कार

Canon ने नुकत्याच घोषणा केलेला Canon R फुलफ्रेम मिररलेस कॅमेऱ्यात आणि Canon RF लेन्सेस मध्ये अनेक नवीन फीचर्स, जसे की मल्टी फंक्शन टच स्लाइडर आणि कंट्रोल रिंग. ह्या लेखात आपण कंट्रोल रिंग आणि त्याच्या वापरा संबंधी अधिक माहिती मिळवू. ऑटो फोकस आल्यापासून फोटोग्राफी करताना डाव्या हाताचा उपयोग केवळ फोकल लेन्थ सेट करणे आणि स्टॅबिलीटी वाढविणे यापूर्तेच सीमित होते. पण कंट्रोल रिंगचा उपयोग करून आपण अनेक गोष्टी करू शकतो, जसे की अॅपर्चर नियंत्रण, शटर स्पीड नियंत्रण, आयएसओ नियंत्रण इत्यादी. आजपर्यंत या सर्व गोष्टी केवळ कॅमर्‍या द्वारे नियंत्रित केल्या ...
Camera

Godox LC500 आईस लाईट

बऱ्याच प्रतीक्षेनंतर Godox ची आईस लाईट आली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे ती ऑसम आहे. वॉर्म आणि कोल्ड रंगसंगती सह, अडजस्टेबल ब्राईटनेस, आणि टेंप्रेचर कंट्रोल. ज्यामुळे पोर्ट्रेट, वेडींग, इत्यादी शॉट्स घेणं सहज आणि सोपे झाले आहे. 258+258 एल ए डी लाईट, आणि सुपेरियर फायबर डिफ्युजर. अॅड्जस्टेबल कलर टेंपरेचर. बॅटरी आॅपरेटेड. एल एल डी डिस्प्ले सह. रिमोट द्वारे संचालीत. हॅंडल आणि स्टॅंड माऊंट कॅरी आणि स्टोअर करणे सोपे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. © सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव....
Camera

ड्रोनच्या व्यावसायिक वापरासाठी 1 डिसेंबरपासून मंजुरी

ड्रोन वापरा संबंधीत नियम सरकारने अधिक स्पष्ट केले आहेत. १ डिसेंबर पासून त्याची अंमल बजावणी करण्यात येईल. तत्पूर्वी ड्रोन मालक, ऑपरेटर, इच्छूक लोकांनी लक्षात घ्यायच्या काही गोष्टी: सामना ऑनलाईन च्या हवाल्याने: देशात ड्रोनच्या व्यावसायिक वापराला मंजुरी मिळाली आहे. मात्र, ड्रोनद्वारे डिलिवरी करण्याच्या सेवेसाठी अजून काहीकाळ वाट बघावी लागणार आहे. नागरी हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम ( आरपीएएस) म्हणजेच ड्रोनच्या वापरासाठी नियमावली जारी केली. हे 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे...