सध्या ऑनलाईन सेलिंग, ई कॉमर्स चे पेव फुटले आहे. हव्या त्या वस्तू घर बसल्या आणि ते देखील स्वस्तात स्वस्त दरात मिळतात. वरकरणी ही संकल्पना जरी फायदेशीर वाटत असली तरी याचे असंख्य धोके आहेत. जसे की बनावट, फेक वस्तूंची विक्री. अॅडव्हांस पैसे घेऊन डिलीव्हरी न देणे. खोट्या स्कीम, ऑफर, सवलती देऊन ग्राहकांची दिशाभूल करणे. बनावट, ग्रे मार्केट उत्पादनांना कुठलीही गॅरंटी अथवा वाॅरंटी मिळत नाही. या फसव्या ऑनलाईन सेलिंग मुळे अनेक कंपन्यांचे नाव धोक्यात आले आहे. कॅनन देखील याला अपवाद नाही.
ऑनलाईन विक्रेत्यांकडून आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून कॅनन ने एक सूचना पत्र सोशल मीडिया च्या माध्यमातून जारी केले.

ऑनलाईन सेलर्स च्या फसव्या ऑफर्स, आणि कमी किमतींना ग्राहकांनी बळी न पडता आपल्या विवेकाने खरेदी करावी. आपल्या अधिकृत विक्रेत्यांची यादी असलेली लिंक देखील कॅनन ने या सुचनापत्रा सोबत प्रकाशित केली आहे.
©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.