July182019
कॅमेरे दिवसेंदिवस अपग्रेड होत आहेत, दुर्दैवाने त्या गतीने फोटोग्राफर काही अपग्रेड व्हायला तयार नाहीत. अशात इंग्लंड हून एक बातमी येतेय. इवा नावाची यंत्रमानव लग्नामध्ये चक्क फोटोग्राफी करतेय.
फूड सर्व्हिंग, सर्व्हे, बटलर, रूम सर्व्हिस, फोटोग्राफी इत्यादींसाठी यंत्रमानव विकणाऱ्या आणि पुरविणाऱ्या https://www.servicerobots.com या वेबसाईट ने इवा एक्सपोजींग साठी उपलब्ध असल्याची जाहिरात आपल्या वेबसाईट वर दिली आहे. इवा केवळ फोटोग्राफी करत नाही, तर ती तुमचे फोटो त्वरित प्रिंट करून तुम्हाला देते. तुमचे फोटो ईमेल, अथवा सोशल मीडियावर मेल देखील करू शकते. इवा मध्ये सध्या फक्त जुजबी फोटोग्राफी ची क्षमता असली तरी येणाऱ्या काळात अनेक सुधारणा त्यात होण्याची शक्यता आहे. आपण किती गतीने अपग्रेड होऊन इवा नावाचे संकट रोखून धरतो, हे येणारा काळच ठरवेल. © सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply