July182019
वेडिंग फोटोग्राफर म्हणून आपण ज्या वेळेला ड्रोन उडवतो आणि त्यावरचे शॉट्स किंवा विडिओज कॅप्चर करतो त्यावेळेला आपल्याला एकसारख्याच मोनोटोनस व्हिडिओज ची अनुभूती होते. परंतु ज्यावेळेला एक कसलेला ड्रोन रेसर फोटोग्राफी साठी ड्रोन उडवतो त्यावेळी काय होते याचा थरार खालील व्हिडिओमध्ये दिसत आहे.
विडिओ बघून आपण नक्कीच आश्चर्यचकित झाले असणार.. कारण आपण उडवत असलेल्या ड्रोन कधीही इतके एक्स्ट्रीम इतके थरारक स्टंट करू शकत नाही. या विडिओ साठी वापरलेला ड्रोन हा फोटोग्राफी ड्रोन नसून रेसिंग ड्रोन आहे. हा ड्रोन चटकन रिव्हर्स जाऊ शकतो किंवा उलटा देखील ओढवू शकतो. लाईट वेट असलेल्या ड्रोन मध्ये कुठलाही इनबिल्ट कॅमेरा नाही. कुठलाही गिंबल अथवा कुठलेही सेन्सर नाहीत. सदर ड्रोन हा फक्त उडवणाऱ्या च्या आकलनावर विसंबून आहे. फोटोग्राफी साठी या ड्रोन वर GoPro Hero7 कॅमेरा माउंट केला गेला होता. जरी आपण या व्हिडिओने स्तिमित झाले असाल तरीही आपल्या मूल्यवान ड्रोन बरोबर असले स्टंट करण्याचा प्रयत्न किंवा मोह टाळावा.. © सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply