February 3, 2019

Nikon कंपनीने D7000, D 7100 या कॅमेऱ्याचे उत्पादन थांबवून काही वर्षे लोटली तरी देखील बाजारात हे कॅमेरे येतात कसे? ग्रे मार्केट? पण जर कॅमेऱ्यांच उत्पादनच होत नाही तर ग्रे मार्केट मध्ये हे कॅमेरे उपलब्ध होणं शक्य नाही. मग हे कॅमेरे येतात कुठून?

याचा मागोवा घेण्यासाठी तडक गुगल देवाकडे धाव घेतली असता काही धक्कादायक माहिती समोर आली. ती अशी की ग्रे मार्केट मधून येणारे बहुतांश कॅमेरे चक्क डुप्लिकेट असतात! होय, डुप्लिकेट.

अमेरिकेतील एका फोटोग्राफरने २०१४ साली ग्रे मार्केट चा D7000 खरेदी केला. हेतू अर्थातच दोन पैसे वाचावे हाच होता. कॅमेरा खरेदीच्या काही महिन्यांतच त्याला फोकसिंग संदर्भात दोष आढळून आला. वरच्या वर दुरुस्तीचे काही प्रयोग फसल्या नंतर त्याने Nikon अधिकृत सर्व्हिस सेंटर कडे धाव घेतली. Nikon कडून तो कॅमेरा डुप्लिकेट असल्याचा खुलासा झाला. कॅमेरा विक्रेत्याकडे चौकशी केली असता त्याने असल्या कॅमेऱ्याच्या जबाबदारी घेण्याबाबत सपशेल नकार दिला! त्या फोटोग्राफर ने Nikon सर्व्हिस सेंटर मध्ये समक्ष भेट दिल्यावर त्यांनी तो कॅमेरा डुप्लिकेट कोणत्या आधारावर आहे याचा तपशील दिला. त्यात सिरीयल नंबर चुकीचा असणे, कॅमेऱ्याच्या मूळ रंगात तफावत असणे, सेन्सर साईज कमी असणे, असे असंख्य दोष दाखवून दिले. या लेखाची मूळ लिंक सोबत देत आहे.

Nikon ने उत्पादन थांबवलेल्या कॅमेऱ्यांची सूची या लिंक मध्ये उपलब्ध आहे.

Nikon चे डुप्लिकेट कॅमेरे कसे ओळखावे हे या लिंक मध्ये दिले आहे.

ग्रे मार्केट पासून कसे वाचाल..

Nikon पाकिस्तान ने चक्क वेबसाईट मार्गदर्शिका जारी केली आहे..

ग्रे मार्केट आणि डुप्लिकेट माल टाळण्याचा सर्वात सुरक्षीत मार्ग म्हणजे कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करणे!

© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

3 thoughts on “ग्रे मार्केट मार्फत येणारे डुप्लिकेट कॅमेरे..

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

X