fbpx

मुलाखत, माझ्या “मराठीतूनच” मी मराठीतूनच बोलणार Leave a comment

नाशिकचे जगद्विख्यात छायाचित्रकार श्री प्रसाद पवार यांनी अमेरिकेतील भटकंती विषयी प्रसिद्ध अशा Travel Channel ला मराठी भाषेत मुलाखत दिली.

कशाविषयी होती ही मुलाखत?

प्रसाद पवार हे नाव फोटोग्राफी विश्वात चिरपरिचित आहेच. ते केवळ त्यांच्या अचंभित करणाऱ्या कारकिर्दी मुळे, किंवा जीवनाच्या खडतर प्रवासामुळे नव्हे, तर त्यांच्या कामामुळे! त्यांच्या ह्याच कामा बद्दल ही मुलाखत होती.
अजिंठा लेण्यांमधील भित्तीचित्रे, शिल्पकला ही नेहमीच जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत असते. दरवर्षी लक्षावधी पर्यटक अजिंठा लेण्यांना भेट देतात. बदलते वातावरण आणि अन्य काही कृत्रिम कारणाने तेथील शिल्पांचा आणि चित्रांचा क्षर सुरू आहे. त्यातील अनेक चित्रांचे मूळ रंग, कथानक हे लोप पावत चालले होते. या अमूल्य कलाकृतीचा नाश पवार सरांमधील कलाकाराला मान्य नव्हता. त्यांनी या चित्रांच्या पुनरुज्जीवनाचा विडा उचलला. अजिंठ्याच्या भित्तीचित्रांचे उच्च दर्जाचे छायाचित्र घेऊन त्यांनी त्या चित्रांमगील कथानक इत्यादी यांचे डिजिटल पुनरुज्जीवन करण्याचे दिव्य कार्य केले आहे. त्या कामाविषयी अधिक माहिती पुढे सविस्तर पोस्ट मध्ये देईलच.

याच दिव्य कार्याची दखल घेत Travel Channel ने त्यांची एक विशेष मुलाखत घेतली.

Travel Channel आणि Legendary Locations सीरिज च्या निर्मात्यां विषयी..

Circle The Globe Production ही पर्यटन, एक्स्प्लोरेशन, थरार मोहिमा इत्यादींवर पुरस्कारप्राप्त लघुपट बनविणारी अमेरिकन कंपनी आहे. ३० वर्षांपासून कार्यरत असलेली ही कंपनी त्यांच्या Legendary Locations या मालिकेसाठी श्री. प्रसाद पवार यांची मुलाखत घेत आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे जगभरात ९० दशलक्ष प्रेक्षक आहेत!

या सीरिज साठी पवार सरांनी चक्क मराठीत मुलाखत दिली. आणि कंपनीच्या अनुवादकाने ती इंग्रजीत अनुवादित केली.

मुलाखत, माझ्या ” मराठीतूनच ”

मी मराठीतूनच बोलणार ,

अनुवादक ” त्यांनी ” वापरला

मराठी ते इंग्रजीसाठी …

– श्री. प्रसाद पवार (फेसबुक वरून साभार)

श्री. प्रसाद पवार यांच्या फेसबुक वॉल वरून साभार

मला मराठी कळले असते तर प्रसाद पवार अजून समजला असता ….

– लॉरेन टेलर

निर्मात्या, Legendary Locations

एका जगद्विख्यात मराठी फोटोग्राफर ने धरलेला मातृभाषेचा आग्रह हा खरंच कौतुकास्पद आहे!

©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close