fbpx

भविष्य छोट्या कॅमेऱ्यांचा, उच्च प्रतीच्या मिररलेस कॅमेऱ्यांचा Leave a comment

२०१८ ने फोटोग्राफी विश्वाला बरीच नवनवी उत्पादने दिलीत. पण गेम चेंजर ठरला तो मिररलेस कॅमेऱ्यांचा उदय! जवळपास सर्वच कॅमेरा उत्पादक कंपन्यांनी मिररलेसच्या रणांगणामध्ये कंबर कसली आहे. कॅमेरा विक्री करताना नेहमी येणारा एक अनुभव असा की कॅमेरा किती चांगला ह्यापेक्षा कॅमेरा किती मोठा या निकषावर कॅमेरा कोणता घ्यावा हे ठरवले जाते. आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचा छोटा कॅमेरा दुर्लक्षित केला जातो.

Fujifilm X-T3, Canon EOS R, Nikon Z 6 आणि Z 7, Blackmagic Cinema 4K pocket, Sony A7 MIII, अथवा Panasonic GH5. सर्वच DSLR चे लघु अवतार, एक से बढकर एक असे आविष्कार! अतिजलद फोटोग्राफी असो फिल्म मेकिंग, हे कॅमेरे कुठेच कमी नाहीत.

व्हिडिओ च्या दर्जावर परिणाम करणारी एक बाब म्हणजे बीट डेप्थ आणि क्रोमा सब सॅम्पलींग. त्यात अन्य काही बाबी आहेतच, परंतु 4:2:2 10 बीट ने रेकॉर्डिंग करण्याची क्षमता ही प्रो कॅमेरा आणि घरगुती वापराच्या कॅमेरा यातील फरकाचा मुद्दा ठरतो. आणि हा फरक विस्मयकारक रित्या नाहीसा होत चालला आहे. 2017 मध्ये लाँच झालेला Panasonic GH5 हा कॅमेरा आणि Black Magic सिनेमा 4K पाॅकेट कॅमेरा मायक्रो फोर थर्ड सेन्सर वर ऑलरेडी 4:2:2 10 बीट ने रेकॉर्डिंग करत आहे. Sony A7 MIII, Canon EOS R, Nikon Z 6 आणि Z7 आदी फुलफ्रेम् कॅमेरे 4:2:0 8 बीट ने रेकॉर्डिंग करतात. बीट डेप्थ चा विचार करत

केवळ कॅमेरे छोटे झाले असे म्हणने देखील चूक ठरेल. अॅक्सेसरिज देखील नाट्यमय रित्या छोट्या आणि हलक्या झाल्या आहेत. आणि पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त आणि सुधारित होत चालल्या आहेत. लाखो रुपयांच्या मॉनिटर ची जागा लीलीपुट सारख्या 7″ 4K स्क्रीन ने घेतली आहे. डॉली, क्रेन, ट्रॉली, रिग इत्यादींची जागा लहानग्या गिंबल ने घेतली. अंतर्गत हायस्पीड कार्ड मुळे बाह्य रेकॉर्डर ची गरज भासत नाही.

Wetalkuav.com

तुम्ही एका गोष्टीचा विचार केला का? २० वर्षांपूर्वी फिल्म मेकिंग साठी लागणार ट्रक भर साहित्य आज आपण एक छोट्याशा बॅग मध्ये बाळगतो.

हल्लीच्या मीररलेस कॅमर्‍यामध्ये महागड्या प्रो कॅमेऱ्याचे सर्वच फीचर समाविष्ट केलेले आहेत, ते देखील किमान किमतींमध्ये! छोटे कॅमेरे क्वालिटी च्या बाबतीत मोठ्या कॅमेऱ्यां पेक्षा कुठेही कमी नाही. छोटे कॅमेरे = सुमार क्वालिटी हे समीकरण निश्चितच बदलले आहे. आता वेळ आली आहे आपली मानसिकता बदलण्याची.

©सर्व हक्क Sharp Imaging, अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close