November 17, 2018

वरकरणी फोटोग्राफी सोपी वाटत असली तरी प्रत्यक्षात खूप कष्टदायक काम आहे. कालच एका स्पोर्ट्स व्हिडिओ ग्राफरचा स्प्रिंट कव्हर करतानाचा व्हिडिओ बघितला. प्रत्यक्ष खेळाडूंच्या गतीने, नव्हे तर त्यांच्यापेक्षाही सरस तो पळत आहे. ते देखील अवजड कॅमेरा खांद्यावर घेऊन!

सब्जेक्ट कव्हर करताना त्याच्या नैसर्गिक हालचाली बाधित होऊ न देता परफेक्ट शॉट मिळवणे हे दिव्यच आहे. पण हे पर्फेक्षण कमवत असताना नकळतपणे आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट गमावत असतो, ते म्हणजे आपले आरोग्य! आजचा लेख त्याविषयी..

Courtesy: Pinterest

फोटोग्राफी करताना नाना प्रकारच्या शारीरिक हालचाली आपण करत असतो. त्या हालचाली करताना आपल्या स्नायूंवर अतिरिक्त ताण पडतो. अवजड कॅमेरे आपल्या हातांवर तासंतास सांभाळावे लागतात. अन्य इक्विपमेंट ची बॅग आपल्या पाठीवर सदैव असतेच. गळ्यात लटकविलेल्या कॅमेरा हा मानेच्या, पाठदुखीचा आजारास कारणीभूत ठरतात. त्यात भरीस दुचाकी प्रवास.

अनेकदा लग्नांमध्ये उशिरापर्यंत चालणारे विधी, त्यानंतर बॅकअप घेणे, बॅटरी चार्ज करणे, पुढच्या दिवसासाठी इक्विपमेंट तयार करण्याचे आपले विधी आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासून असलेल्या कार्यक्रमासाठी लवकर उठणे, यात होणारा निद्रानाश. त्यात लग्न समारंभातील अनारोग्यादयी आहार.

Eyedoctorguide.com

कार्यक्रमानंतर तासंतास बसून एडिटिंग. रात्रंदिवस डोळ्यांवर पडणारा ताण या गोष्टी आपल्या आरोग्यास हानिकारक ठरतात. या सर्वच गोष्टींवर आपण काही ना काही पर्याय शोधू शकतो.

आपले वजन नियंत्रित ठेवणे.

कॅमेरा बेल्ट गळ्यात न लटकविता, शोल्डर बेल्ट वापरणे.

कॅमेरा बॅग क्षमतेपेक्षा जास्त न भरता, वजनाचे प्रमाण निश्चित ठेवणे. कॅमेरा बॅग कमरेच्या खाली जाऊ न देता, बरगड्यांच्या लेव्हल मध्ये ठेवावी. सर्व इक्विपमेंट नेहमीच बॅकपॅक मध्ये ठेऊन नेहमीच बॅकपॅक पाठीवर ठेवणे टाळा. इक्विपमेंट साठी सुरक्षित जागेची मागणी करा.

शक्य तितका ट्रायपॉड चा वापर करावा. एकाच पोसचर मध्ये दीर्घकाळ काम करणे टाळावे. चुकीच्या पोसचर मध्ये फोटोग्राफी करणे टाळावे.

दररोज स्ट्रेचिंग, योगासने इत्यादी व्यायाम करा. प्राणायाम अल्पनिद्रेस लाभदायक आहे.

शक्य तेथे घरून जेवणाचा डबा न्या. डबा घेऊन जाणे शक्य नसल्यास, मर्यादित आणि आरोग्यास पूरक असाच आहार घ्या. शूटच्या दरम्यान भरपूर पाणी प्या. एक लेन्स कमी बाळगा पण पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा.

लो लाईटमध्ये एडिटिंग न करता, पुरेशा प्रकशामध्येच संगणक वापरा. बसण्यासाठी आरामदायक खुर्ची वापरा. पुरेशी झोप घ्या. प्राणायाम आणि योगासने केल्याने शारीरिक व मानसिक ताण कमी होतो.

© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

8 thoughts on “फोटोग्राफी आणि आरोग्य समस्या

  1. खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ह्याच छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो

  2. सर आपल्याला मनापासुन धन्यवाद.
    तुम्ही आज खुप मोलाची माहिती सर्व फोटोग्राफर मित्रांना दिलीत त्याबद्दल आपला आभारी आहे.

  3. खुपच छान आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली, त्याबद्दल शार्प इमॅजिंग आपले खुप खुप मनःपुर्वक आभार, आजकाल आपण काम आणि पैशांच्या मागे ईतके धावतो , त्यामुळे नकळत आपला आराम आणि लाखमोलाच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो , आपल्याला 40 शी नंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात , आणी नंतर दवाखाने सूरू होतात.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

X