DSLR चे बाह्य रचनाशास्त्र (Ergonomics)

प्रथमदर्शनी DSLR दिसायला आणि वापरायला किचकट वाटत असला तरी त्याला अधिकाधिक युजर फ्रेंडली आणि सुटसुटीत बनविण्यासाठी तंत्रज्ञांची, डिझाईनर ची टीम ही सतत प्रयत्नशील असते. तुमचा कॅमेरा कितीही अत्यधूनिक असला, कितीही नवनवे तंत्र त्यात असले तरीसुद्धा जर त्या कॅमेऱ्याचे ergonomics चुकीचे असेल तर तो कॅमेरा तितक्या प्रभावीपणे वापरणे शक्य होणार नाही. DSLR घेताना बाह्य रचानाशास्त्राच्या कोणत्या बाबींचा विचार करावा ह्याबद्दल समजावून घेऊ.

1. बॉडी साइज

कॅमेरा बॉडी साईजच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, छोटी पण हातात मावेल इतकी मोठी बॉडी असणे उत्तम. सामान्यतः ग्रामीण भागातील फोटोग्राफर्सना बॉडी जितकी मोठी, तितके जास्त उत्पन्न हे समीकरण मनात पक्कं झालं आहे. पण मोठी बॉडी नियंत्रित करणे कठीण असते. हल्ली मिररलेसच्या बाजारात कॅमेरा बॉडी छोट्यात छोटी बनविण्याचा अट्टाहास जणू चालवला होता. अर्थात काही अपवाद आहेतच. पण अति छोटी कॅमेरा बॉडी नियंत्रण करणे देखील कठीणच.

2. सेंटर ऑफ ग्रॅविटी

बॉडी ग्रीपच्या आधारे एका हाताने लेन्स सह, तसेच लेन्स शिवाय पकडली असता, बॉडी चे संतुलन सहजगत्या राहते का हे बघावे. कारण बऱ्याचदा एका हाताने फोटोग्राफी करत असताना बिघडलेल्या संतुलनाचा फटका आपल्याला बसतो. किंबहुना अशा असंतुलित कॅमेरा बॉडी ट्रायपॉड, गिंबल वर सेट करणे देखील अवघड जाते.

3. व्हेदर सीलिंग

कॅमेरा बॉडी व्हेदर सील्ड किंवा व्हेदर प्रूफ आहे का. अति विषम वातावरणाचा कॅमेरा बॉडी, अंतर्गत भाग किंवा फोटोग्राफी इत्यादींवर काही परिणाम होता कामा नये. म्हणून व्हेदर सीलिंग आवश्यक आहे.

4. लेन्स व्हिविंग अॅंगल

आपला मेंदू हा उपजतच सरळ, डोळ्यांच्या एका रेषेत बघण्यासाठी प्रोग्राम केलेला असतो. काही कॅमेऱ्यां मध्ये लेन्स एका ठिकाणी तर व्ह्यू फाइंडर दुसऱ्या ठिकाणी. अशा डिजाइन ने सब्जेक्ट कडे नैसर्गिक दृष्टीने बघणे, त्याचा आकलन करणे कठीण असते. त्यामुळे लेन्स आणि त्याच रेषेमध्ये व्ह्यू फाइंडर असणे कधीही हिताचे.

5. डिस्प्ले

कॅमेरा डिस्प्ले ची क्लियारिटी, रंग वैविध्य हे आपल्या कॅमेऱ्याच्या क्लीयारिटी, रंग वैविध्याशी सुसंगत आहे का? कॅमेरा डिस्प्ले 360° रोटेट होतो का? हल्ली एकाच कॅमेर्यामध्ये शक्य तितके अधिकाधिक फंक्शन दिलेले असतात. ते सर्वच फंक्शन वापरण्यासाठी अधिकाधिक बटणं आवश्यक असतात, टच स्क्रीन मुळे बटणांची संख्या खूपच कमी होण्यास मदत होते.

6. बॉडी वेट

कॅमेरा बॉडी वेट इतके कमी असावे की दीर्घकाळ फोटोग्राफी करून देखील हातांवर, खांद्यावर अधिक ताण पडू नये. पण बॉडी वेट किमान इतके असावे की ज्यामुळे पुरेशी स्टाबिलिटी मिळावी.

7. ग्रीप

बॉडी ग्रीप मुळे दीर्घकाळ फोटोग्राफी करताना देखील हातांना श्रम पडू नयेत, कॅमेरा हातातून पडू नये, हात आणि कॅमेरा बॉडी ह्यामध्ये हवा खेळती रहावी अशी नक्षी असावी. ग्रीप चे रबर हे वर्षानुवर्षे टिकेल इतके मजबूत आणि उच्च दर्जाचे असावे. ग्रीप बॅक्टेरिया मुक्त असावी.

8. बटण

बटणांशिवा य कॅमेऱ्याची कल्पनाच होऊ शकत नाही. पण बटणांची रचना वापरण्यासाठी सोपी असावी. कुठल्याही पद्धतीचे मिसक्लिक होणार नाही ह्याची दक्षता घेतली गेली असावी. किमान की ट्रॅव्हल अंतर हे मेन्टेन केले गेले पाहिजे. ही बटणं टिकाऊ असावीत.

9. ड्युर्याबिलीटी

कॅमेरा बॉडी व चेसिज मजबूत असावी. हल्ली कार्बन फायबर, फायबर बॉडी, आणि मॅग्नेशियम अलॉई चेसिस चा बोलबाला आहे.

© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Sharp Imaging

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s