fbpx

सर्वोत्तम पोर्ट्रेट घेण्याची ट्रिक.. Leave a comment

तसे फोटोग्राफीचे अनेक प्रकार आहेत. पण भारतात लग्नातील फोटोग्राफी आणि अन्य प्रकार ह्यात व्यस्त प्रमाण आहे. शंभरातील ९९ लोक हे वेडिंग फोटोग्राफी करतात. आणि त्यातील ९० हे पोर्ट्रेट घेतात. तुमच्या पोर्ट्रेटला जिवंतपणा आणण्याची ट्रिक या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ.

डोळे हे मनाचे पट असतात. डोळे मनातील भाव दर्शवितात. डोळ्यांवर फोकस करून, विविध लाईट वापरून, अँगल वापरून आपण सब्जेक्ट च्या मनातील भाव कॅमेऱ्यात टिपू शकतो.

अनादी काळापासून भारतीय ऋषींना हे माहीत होतं. कुठल्याही कलेला केवळ कला म्हणून न बघता शास्त्र म्हणून त्या कलेला अद्ययावत केले गेले. यात ज्या तत्वज्ञानाचा वाटा होता त्यांना ऋषीची उपाधी दिली जात. काश्मिरच्या ऋषी अभिनव गुप्त यांनी वाद्य, आवाज, अकोस्टिक इत्यादी क्षेत्रांत मोठे संशोधन केले होते. आजही अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्यापीठांमधून त्यांच्या कामावर पुनरसंशोधन होऊन डॉक्टरेट मिळविली जाते. नगरच्या पारनेर तालुक्यात पराशर ऋषींनी कृषी क्षेत्रात संशोधन करून भात लागवड विकसित केली होती. दक्षिणेत काही ऋषींनी कथकली ह्या नृत्याविष्कारावर संशोधन केले. कथकली मध्ये नर्तक आपल्या नृत्याचे कथानक केवळ डोळ्यांनी विशद करतो.

डोळ्यात असलेली हीच ताकद ओळखून सुप्रसिद्ध चित्रकार आणि आधुनिक ऋषी लिओनार्दो दा विंचीने अजरामर पेंटिंग्ज बनविल्या. या सर्व ऋषींच्या कार्याचा फायदा आपण घेऊयात. आणि डोळ्यांतून सब्जेक्टच्या मनाचा वेध घेणारी फोटोग्राफी करूयात!

© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close