लेन्स बनविण्याचे तंत्रज्ञान जरी बव्हंशी एकच असले तरी प्रत्येक उत्पादक आपल्या तंत्राला एक नाव देतो. (बऱ्याचदा पेटंट कायद्याचं उल्लंघन होऊ नये म्हणून) आणि त्या नावाचं संक्षिप्त रूप लेन्स ला जोडले जाते. जेणेकरून लेन्स चे स्पेसिफिकेशन्स वापरकर्त्याला कळावे. Nikon ची लेन्स ची शृंखला आणि संख्या मर्यादित असली तरी त्यांच्या इकोसिस्टिम मध्ये लेन्स चे प्रकार खूप जास्त आहेत. या लेखामध्ये तुम्हाला Nikon च्या लेन्सेस ची नावं काय दर्शवितात व ती कशी वाचावी हे समजावून घेऊ.
* ह्या लेखात सध्या वापरात असलेल्या लेन्सेस विषयीच माहिती दिलेली आहे.
1. फोकस टाईप
- AF: Auto Focus
- AF-S: Auto Focus Silent (यात सायलेंट वेव मोटर वापरली जाते)
- AF-P: Auto Focus Pulse (स्टेपर टाईप मोटर)
2. माऊंट टाईप
- DX: क्रॉप सेन्सर सपोर्ट लेन्स
- FX: फुल फ्रेम सपोर्ट लेन्स
- CX: मिरर लेस N1 सिरीज ची CX माऊंट लेन्स
- Z: फुल फ्रेम मिरर लेस Z सिरीज ची Z माऊंट लेन्स
3. फोकल लेंथ
-
रेंज: फोकल लेंथ ची रेंज, उदा. 24-70, 70-200 ई. दर्शविण्यासाठी
-
फिक्स: फिक्स फोकल लेंथ 50mm, 85mm इत्यादी दर्शविण्यासाठी.
4. अपर्चर
-
अपर्चर दर्शविण्यासाठी. उदाहणादाखल f/2.8, 4, 5.6 इत्यादी.
5. स्पेशल फीचर
- G: अपर्चर रिंग नसलेली लेन्स
- E: इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित लेन्स
- D: सेन्सर ते सब्जेक्ट हे अंतर दर्शविणारी लेन्स
6. इंटर्नल स्टॅबिलाईझेशन
- IF: इंटर्नल स्टॅबिलाईझेशन असलेली लेन्स
7. कोटींग टाईप
- ED: एक्स्ट्रा लो डिस्पर्शन
- N: नॅनो क्रिस्टल कोटींग
- FL: फ्लुराईट कोटींग
- PF: फेज फ्रेसनेल तंत्राने युक्त लेन्स
8. लेन्स स्टॅबिलाईझेशन
- VR: व्हायब्रेशन रिडक्षण
9. जनरेशन
- I, II, इत्यादी लेन्स जनरेशन दर्शवितात
10. Noct
- अल्ट्रा लो लाईट वापरासाठी, अधिक मोठा अपर्चर असलेली लेन्स.
©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.
Nice information for lens
Thanks