September 23, 2018

लेन्स बनविण्याचे तंत्रज्ञान जरी बव्हंशी एकच असले तरी प्रत्येक उत्पादक आपल्या तंत्राला एक नाव देतो. (बऱ्याचदा पेटंट कायद्याचं उल्लंघन होऊ नये म्हणून) आणि त्या नावाचं संक्षिप्त रूप लेन्स ला जोडले जाते. जेणेकरून लेन्स चे स्पेसिफिकेशन्स वापरकर्त्याला कळावे. Canon ची लेन्स ची शृंखला आणि संख्या प्रचंड मोठी असली तरी त्यांच्या इकोसिस्टिम मध्ये लेन्स चे प्रकार योग्यरीत्या नियंत्रित आहेत. या लेखामध्ये तुम्हाला Canon च्या लेन्सेस ची नावं काय दर्शवितात व ती कशी वाचावी हे समजावून घेऊ.

* ह्या लेखात सध्या वापरात असलेल्या लेन्सेस विषयीच माहिती दिलेली आहे.

1. लेन्सेस चा प्रकार

 • EF: इलेक्ट्रॉनिक सिरीज ची फुल फ्रेम सपोर्ट लेन्स, क्रॉप सेन्सर कॅमेऱ्यावर देखील माऊंट करता येते.
 • EFS: इलेक्ट्रॉनिक सिरीज ची क्रॉप सेन्सर सपोर्ट लेन्स, फुल फ्रेम कॅमेऱ्यावर माऊंट होत नाही.
 • EFM: इलेक्ट्रॉनिक मिरर लेस सिरीज ची M माऊंट लेन्स
 • RF: मिरर लेस R सिरीज ची लेन्स

2. फोकल लेंथ

 • रेंज: फोकल लेंथ ची रेंज, उदा. 24-70, 70-200 ई. दर्शविण्यासाठी
 • फिक्स: फिक्स फोकल लेंथ 50mm, 85mm इत्यादी दर्शविण्यासाठी.

3. अपर्चर

 • अपर्चर दर्शविण्यासाठी. उदाहणादाखल f/2.8, 4, 5.6 इत्यादी.

4. स्पेशल फीचर

 • L: लक्झरी सिरीज
 • TSE: टील्ट शिफ्ट एक्जाॅटिक

5. इमेज स्टॅबिलाईझेशन

 • IS: इमेज स्टॅबिलाईझेशन

6. जनरेशन

 • I, II, III इत्यादी लेन्स जनरेशन दर्शवितात

7. मोटर टाईप

 • STM: स्टेपर मोटर
 • USM: अल्ट्रा सॉनिक मोटर

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

4 thoughts on “Canon लेन्सेसचे नाव आणि त्यांचा अर्थ

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

X