तुम्ही काढलेली छायाचित्रे निश्चितच तुमच्या कॅमेऱ्याने जन्माला घातलेला कलाविष्कार आहे. तरीही फोटोग्राफी या कलेला शास्त्राची जोड आहे. म्हणूनच एका चांगल्या छायाचित्रकाराला साधा कॅमेरा वापरून चांगले फोटो घेता येतील, तसेच एखाद्या नवख्या फोटोग्राफरच्या 5D कॅमेऱ्यातून क्रिस्पी, आणि शार्प फोटोज् डिलिव्हर होतील. पण त्या दोन्हीही ईमेजेस सर्वोत्तम नसतील. तुम्हाला सर्वोत्तम इमेजेस घेण्यासाठी फोटोग्राफीच्या कला आणि शास्त्रात पारंगत व्हावे लागेल. तुमचे कॅमेरे तांत्रिक दृष्ट्या प्रगत, नव्हे अतिप्रगत झाले आहेत. तुम्हालाही त्याच गतीने प्रगती करायला हवी. कितीही मुरब्बी फोटोग्राफर असला तरी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट एक्स्पोजर अचीव्ह करता येईलच हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे हिस्टोग्राम वाचणे हे नेहमीच हिताचे आहे.
वरील व्हिडिओ बघता एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे
हिस्टोग्राम तुम्हाला जो डाटा देतो तो कुठल्या आधारावर देतो हे कमी महत्त्वाचे आहे. पण तो आपल्या फोटोबद्दल कुठली इन्फॉर्मेशन देतो, ती वाचायची कशी आणि त्या इन्फॉर्मेशन चा वापर आपण कसा करायचा हे खूप महत्त्वाचे आहे.
हिस्टोग्राम दोन निराळ्या फॉरमॅट मध्ये आपल्याला फोटोग्राफ बद्दल माहिती देतो. फोटो एक्सपोज झाल्या नंतर जर लगेचच आपण हिस्टोग्राम तपासला तर आपण परफेक्ट एक्सपोजर सेट करू शकतो.
पहिल्या प्रकारात डार्क आणि ब्राईट पिक्सेल गणले जातात. म्हणजे डिजिटल इमेज डाटा मध्ये किती प्रमाणात ब्राईट आणि डार्क पिक्सेल आहेत याचा आलेख. हिस्टोग्राम चा डावा कोपरा डार्क पिक्सेल तर उजवा ब्राईट पिक्सेल चे प्रमाण दर्शवतो. डाव्या बाजूला कललेला आलेख म्हणजे तांत्रिक दृष्ट्या अंडर एक्सपोज इमेज तर उजव्या बाजूचा आलेख म्हणजे ओव्हर एक्सपोज इमेज. हा आलेख मधोमध असणे म्हणजे परफेक्ट एक्स्पोज.
दुसरा फॉरमॅट म्हणजे RGB टाईप. माझ्यामते हा सर्वात महत्त्वाचा फॉरमॅट आहे. ह्या हिस्टोग्राम मध्ये केवळ डार्क आणि ब्राईट अशाच परिमाणात ईमेजची रीडिंग न घेता, त्यात रंगांच्या प्रमाणाचा देखील मोजमाप केला जातो. या आलेखा मध्ये देखील डाव्या बाजूला अंडर एक्सपोजर तर उजव्या बाजूला ओव्हर एक्सपोजर दर्शविले जातात. मधोमध तयार झालेला फुगवटा म्हणजे तांत्रिक दृष्ट्या परफेक्ट इमेज.
कधी कधी आपल्यातला कलाकार ह्या तांत्रिक औपचारिकता बाजूला सारतो. पण कुठल्याही परिस्थितीत हिस्टोग्राम नावाचा सच्चा समीक्षक आपल्या फोटोग्राफी मधील तांत्रिक चूक दाखवायला कधीच चुकत नाही.
© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.