fbpx

लहानपणी कचरा वेचायचे आज आहेत इंटरनॅशनल फोटोग्राफर Leave a comment

विक्की रॉय हे एकेकाळी दिल्लीमध्ये कचरा वेचायचे. ढाब्यांवर भांडी घासायचे. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने जाणून घ्या इंटरनॅशनल फोटोग्राफर विकी रॉय यांची कहाणी, ज्यांच्या बेरंगी जीवन फोटोग्राफीमुळे अधिक सुंदर बनले.

विक्की यांनी हॉवर्ड युनिव्हर्सिटीपासून ते गुगल आणि फेसबूकच्या अमेरिकेतील ऑफिसेसपर्यंत अनेक ठिकाणी भाषण केले आहे. हे सर्व घडले फोटोग्राफीमुळे. गरीबीला कंटाळून 11 वर्षांचे असताना विक्की हे पश्चिम बंगालच्या पुरुलियामधून मामाच्या खिशातून 900 रुपये घेऊन पळून गेले होते. दिल्लीला पोहोचल्यानंतर ते स्टेशनवर राहिले. नंतर रस्त्यावरील मुलांबरोबर राहून कचरा वेचू लागले. नंतर त्यांनी पहाडगंजमधील एका ढाब्यावर काम केले. सलाम बालक नावाच्या एनजीओच्या कार्यकर्त्याने त्यांना पाहिले आणि एनजीओत नेले. त्यांनी शाळेत प्रवेश मिळवून दिली. दहावीत चांगले मार्क मिळाले नाही म्हणून कोणीतरी म्हटले तुम्ही अभ्यासात चांगले नाही, दुसरे काहीतरी करा. विक्की म्हणाले फोटोग्राफी करायची इच्छा आहे. एनजीओच्या एका टिचरने 500 रुपयांचा एक कॅमेरा विक्कीला दिला. तेव्हापासूनच विक्कीचे जीवन बदलले. त्यांचे फोटो पाहून ब्रिटनचे प्रिन्सही त्यांचे फॅन बनले. फोर्ब्स एशिया 30 अंडर 30 लिस्टमध्ये विक्की यांचा समावेश होता. ज्या फोटोग्राफीच्या माध्यमातून विक्की यांना सर्वकाही मिळाले त्यातूनच ते आता समाजाची परतफेड करत आहेत. विक्की यांची अनेक पुस्तके आली आहेत. फोटोग्राफीबरोबरच ते गरीब मुलांना फोटोग्राफी शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करतात.

© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close