कालपरवा पर्यंत व्हिडिओ क्षेत्रापासून काहीसे आलीप्त राहिलेल्या Nikon ने काही दिवसांपूर्वी आपल्या बहुचर्चित Z7 मिररलेस फुलफ्रेम कॅमेऱ्यावर एक म्युझिक व्हिडिओ शुट केला. इंटरनेटवर त्याविषयी बऱ्याच चर्चा रंगत आहेत.
शिकागो, अमेरिका येथील गायिका आणि कलाकार एमिली ब्ल्यु यांच्या म्युझिक व्हिडिओ ला कुठल्याही प्रकारची ग्रेडिंग न करता रिलीज केले आहे असा दावा Nikon ने केला आहे. तसेच संपूर्ण व्हिडिओ बनविताना Nikon च्या शक्तीशाली ऑटोफोकस ला हायलाईट केले आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=fVG4PBqEZhg&w=854&h=480%5Dवरील व्हिडिओ बघता, एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे संपूर्ण व्हिडिओ मध्ये पॅनींग केलेली फारशी आढळत नाही. थोडीफार पॅनींग अगदी मंद गतीने केली आहे. रिग, गिंबल वापरलेला दिसतो पण स्लायडर वापरलेला नाहीच. संपूर्ण व्हिडिओ झूम इन आणि आउट अथवा क्रॉप इन आणि आउट असाच दिसतो. पॅनींग टाळण्याचे नेमके कारण त्या व्हिडिओ ला न्याय देणे, अथवा DOP च्या आवडीनिवडी चा भाग की आणि दुसरे काही ह्यावर चर्चा होऊ शकते. पण एकंदरीत व्हिडिओ बघता Nikon ने व्हिडिओ क्षेत्रात आपली जागा निश्चित केली हे मात्र नक्की!
DPreview वेबसाईट ने ह्या व्हिडिओची मेकिंग रिलीज केली होती. त्यात काही बारकावे आपल्या लक्षात येतील.
[youtube https://www.youtube.com/watch?v=RZsuI1EofMw&w=640&h=360%5D© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.