fbpx

ट्रॅव्हलिंग करताना फोटोग्राफी करायचीय?, जाणून घ्या बेसिक फंडे Leave a comment

आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कैद करण्याचे काम कॅमेरा करत असतो. तरुणाईला तर कॅमेराचे प्रचंड वेड असते. ट्रॅव्हलिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आपण काढत असतो. कॅमेरा हाताळण्याच्या अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याचदा फोटोज चांगले येत नाहीत. म्हणून फोटो काढताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. याविषयीचे काही बेसिक फंडे जाणून घ्या.
फोटोग्राफी म्हणजे फक्त सुंदर छायाचित्र काढणेच नाही. कारण, बहूतांश लोक असेच करताना दिसून येतात. काहीच न सांगता खूप काही सांगण्याचा मार्ग म्हणजे फोटोग्राफी. फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण समाज आणि जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याबरोबरच अनेक गोष्टी इतरांना सांगू शकतो. ट्रॅव्हल आणि टूरिझमला चालना देण्यात फोटोग्राफी महत्त्वाची भूमिका बजावते. एखाद्या जागेचे सौंदर्य, वैशिष्ट्य फोटोग्राफीच्या मदतीने लोकांपर्यंत पोहचवता येते. ज्यामुळे लोक त्या ठिकाणांना भेटी देण्यास उत्सूक होतात. या कारणांमुळे फोटोंची क्वालिटी आणि क्लियारिटी महत्त्वाची ठरते. फोटोग्राफीच्या या बेसिक फंड्यांमुळे तुम्ही काही प्रमाणात प्रोफेशनल फोटोग्राफरसारखे फोटो काढू शकाल, यात शंका नाही.

फोटोग्राफीचे बेसिक नियम –

कॅमेराचे ज्ञान –
परफेक्ट फोटो क्लीक करायचा असल्यास कॅमेरा आणि त्याच्या प्रत्येक फीचरची माहिती असणे गरजेचे आहे. झूम पासून फोकसपर्यंतचे बारकावे माहित असल्यास तुम्ही फोटोला योग्य पध्दतीने कव्हर करू शकता. फोटो क्लिक करताना भरपूर प्रकाश असणे महत्त्वाचे ठरते. तसेच टायमिंग हा फोटोग्राफीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. फोटोशूटसाठी पुरेसा प्रकाश मिळावा म्हणून बऱ्याचदा फोटोग्राफरही दिवसाची वेळ निश्चित करतात. याशिवाय सनसेटचे फोटोजसुध्दा छान काढता येऊ शकतात.

अशाप्रकारे कंपोझ करा फ्रेम –
आपल्याला हव्या त्या गोष्टी एकाच क्लिकमध्ये फोटोत बसवण्याची कला म्हणजे फ्रेमिंग होय. तुम्हाला नेमक्या ज्या गोष्टीला फोटोमध्ये सेंट्रलाईज करायचे आहे, त्या गोष्टीला म्हणजेच तुमच्या सब्जेक्टवर फोकस करणे गरजेचे आहे. नेचर फोटोग्राफी करताना फ्रेमिंगला फार महत्त्व असते. कारण, नेचर फोटोग्राफीमध्ये आपला सब्जेक्ट हा व्यापक असतो.

फोकस –
सब्जेक्टला फोकस केल्यास चांगले फोटोज येतात. अॅनिमल, फ्लॉवर्स आणि वेडिंग फोटोग्राफीमध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. यामुळे बाजूचा भाग ब्लर होऊन मुख्य फोटोज सुस्पष्ट येतात.

फोटोद्नारे सांगा गोष्ट –
ट्रॅव्हलिंग दरम्यान फोटोशूट करताना काढलेले फोटोज अप्रतिम असावेत. जेणेकरून नंतर आपल्या ट्रीपमधील आठवणींना उजाळा मिळावा. या फोटोंचा उपयोग ट्रॅव्हल आणि मॅगझिन स्टोरीसाठीही करता येऊ शकतो. तसेच सोशल मीडियावर या फोटोंना पोस्ट करून आपण भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळवू शकतो.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close