Canon RF लेन्सेस: फोटोग्राफी विश्र्वातील नवा आविष्कार

Canon ने नुकत्याच घोषणा केलेला Canon R फुलफ्रेम मिररलेस कॅमेऱ्यात आणि Canon RF लेन्सेस मध्ये अनेक नवीन फीचर्स, जसे की मल्टी फंक्शन टच स्लाइडर आणि कंट्रोल रिंग. ह्या लेखात आपण कंट्रोल रिंग आणि त्याच्या वापरा संबंधी अधिक माहिती मिळवू.

ऑटो फोकस आल्यापासून फोटोग्राफी करताना डाव्या हाताचा उपयोग केवळ फोकल लेन्थ सेट करणे आणि स्टॅबिलीटी वाढविणे यापूर्तेच सीमित होते. पण कंट्रोल रिंगचा उपयोग करून आपण अनेक गोष्टी करू शकतो, जसे की अॅपर्चर नियंत्रण, शटर स्पीड नियंत्रण, आयएसओ नियंत्रण इत्यादी. आजपर्यंत या सर्व गोष्टी केवळ कॅमर्‍या द्वारे नियंत्रित केल्या जात होत्या.

नव्या R माऊंट ऍडप्टर सोबत देखील हे रिंग कंट्रोल उपलब्ध असेल. ज्यामुळे तुमच्या जुन्या EF अथवा EFS लेन्सेस देखील तितक्याच परिणामकारक रित्या काम करू शकतील.

लेन्स वर कंट्रोल रिंग देण्याचं मुख्य कारण म्हणजे मीररलेस च्या छोट्या बॉडीवर जास्त बटणं बसवता येण आणि त्यांना नियंत्रित करता येणं कठीण जातं. त्यापेक्षा दोन्ही हाताने नियंत्रण करता आल्यास कामाची गती देखील वाढते. ते देखील व्ह्यू फाइंडर मधून प्रत्यक्ष बघत असताना.

कशी ऑपरेट होते ही रिंग?

पिरॅमिड सारखे टेक्सचर असलेली ही रिंग दोन्ही दिशेने फिरू शकते. फोकस अथवा झूमिंग रिंग प्रमाणे कोठेही थांबत नाही. सध्या असलेल्या कुठल्याही रिंगला ही रिंग बदलत नाही, तर ही एक अतिरिक्त रिंग आहे. ही रिंग फिरवताना प्रत्येक स्टॉप वर अगदी बारीक टिक-टिक असा आवाज होतो. हा आवाज इतका मंद असतो की तो फोटोग्राफर ला देखील ऐकू येत नाही. पण रिंग ऑपरेट करत असलेल्या हाताला तो जाणवतो. आपण किती स्टॉप पुढे अथवा मागे गेलो आहोत याची जाणीव त्यामुळे फोटोग्राफर ला होते. व्हिडिओ युजर्सना तो आवाज बंद करता येऊ शकतो. (सर्व्हिस सेंटर च्या सहकार्याने)

सुरुवातीला कॅमेरा फंक्शन रिंग ही बाय डिफॉल्ट बंद केलेली असते. कॅमेरा सेटिंग मध्ये जाऊन आपण ती सुरू अथवा बंद करू शकतो.

रिंग सेटिंग आणि ऑपरेशन संबंधित अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा.

Canon ने या लेन्सेस सोबत 3 वेगवेगळ्या पद्धतीचे ऍडाप्टर्स देखील बनवले आहेत. बेसिक ऍडाप्टर ने कुठलीही EF अथवा EFS लेन्स आपण वापरू शकतो. ऍडजस्टेबल रिंग ऍडाप्टर मुळे आपल्याला RF सिरीज च्या लेन्सेस प्रमाणे EF अथवा EFS लेन्स वापरण्याची मुभा मिळते. तसेच फिल्टर ऍडाप्टर वापरून आपण ND, PZ अथवा न्युट्रल फिल्टर चे इफेक्ट्स आपल्या इमेजला देऊ शकतो. Canon R कॅमेरा सोबत कंपॅटीबल ऍक्सेसरिज बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा.

वरील काही बदल हे आपल्या फोटोग्राफी करण्याच्या जुन्या पद्धतीचा छेद देऊन आपल्या फोटोग्राफी ला अधिक गती देऊन नक्कीच नव्या उंचीवर पोहोचावेल.

© सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Sharp Imaging

One thought on “Canon RF लेन्सेस: फोटोग्राफी विश्र्वातील नवा आविष्कार

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s