Canon ने EOS R या नावाने त्यांनी आपला पहिला फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा लॉन्च केला आहे. 30.3 मेगा पिक्सेल क्षमता असलेल्या या कॅमेऱ्यांची आयएसओ रेंज 100 ते 40000 असणार आहे. ड्युअल ऑटो फोकस तंत्रावर फोकासिंग करणाऱ्या सेंसरच्या जोडीला Canon चा शक्तीशाली Digic 8 प्रोसेसर यात असेल. फुली अर्टायक्युलेटेड टचस्क्रीन आणि हाय रेझोल्युषण OLED डिजिटल व्ह्यु फाइंडर यात असणार आहे.
आकाराने छोट्या कॅमेऱ्य सोबत बरेच बदल देखील आले आहेत. जसे की, लेन्सेस च्या फोकसींग रिंग व्यतिरिक्त झुमिंग आणि मॅन्युअल फोकसींग, झुमींग, अपरचर कंट्रोल डायल लेन्सवरच दिलेले आहेत. कॅमेरा कंट्रोल करण्यासाठी एक स्लायडर देखील नवीन टाकला आहे.
EOS R सोबतच, Canon ने 4 नव्या लेन्सेस सुद्धा जाहीर केल्या आहेत. 24-105mm f/4 L, a 50mm f/1.2mm L, a 28-70mm f/2 L, and a 35mm f/1.8 macro. ऑक्टोबर महिन्यात कॅमेरा विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
© सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.