तुम्ही शोध घेत असलेल्या विषयाला अनुरूप रंग छटा शोधण्याचं काम आता गुगल इमेज सर्चचे रिझल्ट्स अनालाईझ picular द्वारे केले जाणार आहे.
Picular गुगल इमेज सर्च ने सादर केलेल्या इमेजेस अनालाईझ करून त्यातील सर्वात जास्त प्रमाणात असलेल्या रंगाला दर्शावेल. इतकेच नव्हे तर त्याचे कोड सुद्धा तुम्हाला बघता येतील. उदाहरणार्थ समजा आपण ओशन ही सर्च टर्म टाकली तर गुगल सर्चवर समुद्राच्या फोटोग्राफ्स चा भडीमार होईल. त्या सर्व चित्रांमधील सर्वाधिक वापर असलेल्या रंगाला सदर केले जाईल.
स्वीडिश कंपनी फ्युचर मेमारिज ने स्वतःसाठी बनविलेले हे टूल आता सर्वच डिझाईनर ला उपयोगी पडेल. एखाद्या थीम साठी कलर निश्चित करण्यासाठी हे टूल वापरून बघावे.
©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.