fbpx

बोलकी छायाचित्रं घेणे: एक कला. Leave a comment

मोबाईल फोटोग्राफी च्या युगात, फोटोग्राफी खरोखर बच्चो का खेल झालीय. प्रत्येक हातात 20 मेगा पिक्सेल चा कॅमेरा आलाय. कुणीही उठसूट सेल्फी, फुडफोटोग्रफी, अमुक फोटोग्राफी, तमुक फोटोग्राफी करू लागलाय. पण फोटोग्राफी हे कुणाचं पण काम नाहीये. प्रोफेशनल फोटोग्राफर आणि सामान्य लोक यांच्या छायाचित्रांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.

प्रोफेशनल लोकांच्या छायाचित्रांमध्ये कलेची झालर असते. ते त्या चित्रांमागची कथा आणि व्यथा सांगत असतात. केवळ कंपोझिशन, रुल ऑफ थर्डस, अँगल, रंग, लाईट इफेक्ट्स यांच्या पलीकडे जाऊन त्यांचं कथानक सुरू होतं. फोटोज् आपल्याला व्यथित, रोमांचित, आनंदित, अंतर्मुख करू शकतात. ते आपल्या भावनेची तार छेडू शकतात. कलाकारांचे फोटो बोलतात!
फोटोज् खरं बोलतात. ते सांगतात, होय मी इथे आलो होतो, मी हे अनुभवलय. आणि मला ज्याची अनुभूती झाली ते हेच होतं.

शशांक इस्सर च्या स्पेन डायरी मधून साभार

फॅक्ट सांगणारी छायाचित्रे घेण्यासाठी आपल्याला आपल्या नजरेत आणि कॅमेऱ्याच्या नजरेतील फरक ओळखावा लागेल. आपल्या नजरेने आपण एक घटना बघत असतो, दिसणाऱ्या घटनेमुळे आपल्याला त्या घटनेच्या पार्श्वभूमीचे आकलन होते. ह्या गोष्टी कॅमेऱ्याच्या नजरेतून कशा टीपायच्या हे शिकावे लागेल.

तो क्षण महत्त्वाचा असतो. कारण अगदी त्या क्षणामध्येच ती कथा सामावलेली असते. फोटोग्राफी म्हणजे अगदी त्याच क्षणाला कैद करणं. तुमच्या फोटोला कथा जोडणारा तो क्षण तुमच्या फोटोला चैतन्य देऊ शकतो.

साभार: हितेश ओबेरॉय यांचे चिंकारा लीप

तो क्षण आपल्याला टिपता येईलच याची खात्री नाही, पण अभ्यासाने आपण त्याची शक्यता वाढवू शकतो. तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्याशी एकजीव व्हावे लागेल. कॅमेरा सदैव तयार ठेवावा लागेल, आणि सारखं प्रीव्ह्यू न बघता, त्या क्षणावर तुमचे लक्ष केंद्रित करावे.

रंग, छटा यांचा नाट्यमय खेळ देखील बरंच काही बोलतो. त्या खेळाचे पंच तुम्हाला होता येते का पाहा. तुमच्या डोळ्यांना हे रंग पकडण्याची, आणि तुमच्या कल्पकतेला ते कॅमेऱ्यात उतरवण्याची सवय लावा.

Crystal Vision Photography कडून साभार.

तुमची दृष्टी तुमच्या कलेचा दर्जा उंचावत असते. बाह्य आणि अंत:दृष्टी. आपले मन. ही दृष्टी सर्वांना सारखी नसते, जो तो आपापल्या परीने त्याचे आकलन करत असतो. रंग, तथ्य आणि योग्य क्षण हे तुमच्या छायाचित्राच बाह्य स्वरूप आहे, तर तुमचा दृष्टिकोन ही त्याची आत्मा!

सौजन्य: Pixl Photography; वारी

हे शिकवता येणं शक्य नाही, आपण अंतर्मनाचा शोध घेऊन तिला धार देऊ शकतो फार तर. कारण दृष्टी आपल्याला आपल्या संस्कृतीतून आणि संस्कारातून मिळते.

आपल्या छायाचित्रांना बोलायचंय. त्यांना शब्द द्या!

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close