50 मेगा पिक्सेल चा कडक कॅमेरा घेतला आणि आता “मला जे जे हवं ते मी मिळवतोच” असं वाटू लागलंच होतं की, साखर झोपेतून कुणीतरी किंचाळत उठवाव, अगदी तशी ही बातमी! माझा गेल्या महिन्यात घेतलेला कोरा करकरीत कॅमेरा आज आउटडेटेड झालाय! आणि आता मला मोक्कार दीडशे मेगा पिक्सेल चा कॅमेरा घ्यावा लागणार. कारण Phase One कंपनीने आत्ताच 150MP कॅमेरा लाँच केलाय.
Phase One ने IQ4 तंत्रावर आधारित 150MP चे दोन कॅमेरे अनाऊंस केलेत.
(पुढील पॅराग्राफ शंकर महादेवन यांच्या ब्रिथलेस स्टाईल ने वाचावे, लै महत्वाचं नाही)
ह्या कॅमेऱ्यात WiFi आहे, USB-C कनेक्टिव्हिटी आहे. NAS टाईप स्तोरेज क्षमता आहे. नेटवर्क सोल्युशन आहे. XQD कार्ड सपोर्ट आहे. फास्ट फ्रेम रेट आहे. डायरेक्ट आणि इंडिरेक्ट चार्जिंग आहे. आणि आणखी बरंच काही भारी भारितल आहे…
आता इतकं सगळं मी सांगत बसण्यापेक्षा खालच्या व्हिडीओमध्ये तुम्हीच बघून घ्या ना.
किंमत फक्त ₹ 40,00,000.00. होय. चारावर सहा शून्य म्हणजेच चाळीस लाख!
प्लॅन कॅन्सल! मी त्यापेक्षा जाऊन आपली मर्सिडीज घेऊन येतो. बघू बजाज फायनान्स वर 0% व्याजदरावर हा कॅमेरा आल्यावर.. तोपर्यंत राम राम..
आणि नेहमी प्रमाणे: ह्या पोस्टचे कॉपीराइट आमच्याकडेच आहेत. उगाच ढापाढापी करू नका. अर्थात:
©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.