fbpx

ड्रोनच्या व्यावसायिक वापरासाठी 1 डिसेंबरपासून मंजुरी Leave a comment

ड्रोन वापरा संबंधीत नियम सरकारने अधिक स्पष्ट केले आहेत. १ डिसेंबर पासून त्याची अंमल बजावणी करण्यात येईल. तत्पूर्वी ड्रोन मालक, ऑपरेटर, इच्छूक लोकांनी लक्षात घ्यायच्या काही गोष्टी:

सामना ऑनलाईन च्या हवाल्याने:

देशात ड्रोनच्या व्यावसायिक वापराला मंजुरी मिळाली आहे. मात्र, ड्रोनद्वारे डिलिवरी करण्याच्या सेवेसाठी अजून काहीकाळ वाट बघावी लागणार आहे. नागरी हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम ( आरपीएएस) म्हणजेच ड्रोनच्या वापरासाठी नियमावली जारी केली. हे 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. त्यात 250 ग्रॅम किंवा त्याहून अधिक वजनाच्या ड्रोनच्या वापरासाठी लायन्सेस घेणे आवश्यक आहे.

वस्तूंची डिलिवरी वगळता इतर व्यावसायिक वापरासाठी ड्रोनला परवानगी देण्यात आल्याचे प्रभू यांनी सांगितले. आत्पकालीन प्रंसगात, कृषी सर्वेक्षणासाठी तसेच सरकारी यंत्रणांना ड्रोनने काही वस्तू पाठवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मात्र, विमानतळचा परिसर, आंतरराष्ट्रीय सीमा, समुद्रकिनारे, राज्यातील सचिवालये, लष्करी केंद्रे आणि संवेदनशील ठिकाणी ड्रोनच्या वापराला बंदी असेल. हे परिसर ‘नो ड्रोन झोन’ असतील.

ड्रोनच्या वापरासाठी रजिस्ट्रेशन, ऑपरेटर परमीट, उड्डाणसाठी अर्ज आणि फ्लाइट प्लॅन अपडेट करण्यासाठी ‘डिजिटल स्काई’ नावाची यंत्रणा उभारण्यात येत आहे. ही यंत्रणा 1 डिसेंबरपासून ऑनलाईन सेवा देणार आहे. त्याची लिंक नागरी विमान महासंचालनालयाच्या (डीजीसीए) च्या वेबसाइटवर दिसणार आहे. 250 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोनला नॅनो ड्रोन म्हणातात. त्यांच्या वापरासाठी परवानगी किंवा रजिस्ट्रेशन गरजेचे नाही. मात्र, ते 50 फूट उंचीपर्यंतच उड्डाण करू शकतील. तर 250 ग्रॅमपासून 2 किलोपर्यंतच्या ड्रोनला माइक्रो ड्रोन म्हणतात. या ड्रोनच्या वापरासाठी युनीक अयटिंफिकेशन नंबर, नो परमिशन, नो टेक ऑफ टेक्नोलॉजी आणि स्थानिक पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ते 200 फूंटापर्यंत उड्डाण करू शकतील. तर 2 ते 25 किलो, 25 ते 150 किलो आणि 150 पेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनच्या वापरासाठी रजिस्ट्रेशन, ऑपरेटर परमीटसह फ्लाइट प्लॅन देणे आवश्यक आहे. हे ड्रोन 400 फूटांपर्यंत उड्डाण करू शकतील. तसेच या ड्रोनमध्ये रिटर्न टू होम सिस्टीम असणे गरजेचे आहे. म्हणजे ड्रोन भरकटल्यास ते परत जेथून उड्डाण केले तेथे परत येऊ शकतील.

– सामना ऑनलाईन कडून साभार

ठळक मार्गदर्शक तत्वे:

नो ड्रोन झोन:

एअर पोर्ट, आंतरराष्ट्रीय सीमा, किनारी सीमा, राज्य सचिवालय, मिलिटरी बेस, अन्य महत्त्वाची ठिकाणे ही नो ड्रोन झोन म्हणून घोषित केली आहेत.

ड्रोन वापरा संबंधीत अधिकार

DGCA ही संस्था ड्रोन आयात, वापर, उड्डाण, व संचालन संबंधित परवाने देण्यास जबाबदार असेल.

ड्रोन उड्डणाची किमान पात्रता

ऑपरेटर किमान १०वी पास, इंग्रजीचे ज्ञान आवश्यक, DGCA मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षित असावा. वय मर्यादा: १८ वर्षे पूर्ण

तक्रार निवारण व अपघात

ड्रोन संबंधित तक्रार निवारण व अपघात सूचना देण्यासाठी डिजिटल स्काईज या प्लॅटफॉर्म ची सुरुवात केली आहे.

कारवाई

नियम तोडणाऱ्यावर दंड, कोठडी, जप्ती, लायसेन्स रद्द करणे इत्यादी दंडात्मक कारवाई शक्य.

आंतरराष्ट्रीय सीमा

सीमेच्या २५किमी क्षेत्रात तसेच तटिय सीमा क्षेत्रात ड्रोन उड्डाण प्रतिबंधित असेल.

जुने ड्रोन खरेदी विक्री

जुन्या ड्रोन चा युनिक आयडेंटिटी क्रमांक हस्तांतरित होणार नाही. तो विक्री करतेवेळी रद्द करून नव्याने आवेदन करणे आवश्यक असेल.

वेडिंग फोटोग्राफी

स्थानिक पोलिस स्टेशनकडे किमान २४ तास आधी सूचना देणे आवश्यक. ६० मीटर उड्डाण मर्यादा. अनुमती केवळ २ दिवसांसाठी. रात्री ड्रोन उडविण्याकरिता DGCA कडून विशेष अनुमती घ्यावी लागणार.

© सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close