fbpx

मिररलेस जुना झालाय, आता खुणावतोय आॅप्टिकलेस तंत्र! 3

श्री. मेनन यांनी आॅप्टिकलेस तंत्राचा वापर करून ऊटाह नावातील U या अक्षराचा फोटो घेतलाय. सध्याचा फोटो जरी लो रेजोल्यूशन असला तरी भविष्यात तो हाय रिजोल्यूशन मध्ये बदलता येऊ शकतं. (सौजण्य: ऊटाह विद्यापीठ वेबसाईट)

आश्चर्यचकीत झालाय ना? खरं आहे. मिरर लेस तंत्रज्ञान येतं, हळू हळू वाढतं, आता आता कुठे काही लोकांच्या हातात मिरर लेस फुल फ्रेम कॅमेरे पडलेत. हे सर्व होते ना होते तोच एक विस्मयकारक बातमी समोर येते की “एका भारतीय शास्त्रज्ञाने आॅप्टिकलेस फोटोग्राफीचं तंत्र विकसित केलंय”! उटाह् विद्यापीठ, अमेरिका येथील संगणक व विद्युत तंत्र विभागातील भारतीय वंशाचे प्राध्यापक श्री. राजेश मेनन यांनी हे तंत्र विकसित केलंय. या तंत्रामुळे कुठलीही काच ही सेंसरला जोडली जाऊ शकते!

भविष्यात तुमच्या गाडीच्या किंवा खिडकीच्या काचांचे रूपांतर जर कॅमेऱ्यात झाले तर आश्चर्य वाटू देऊ नका! ह्या तंत्रात होतं असं की लेन्स म्हणजेच आॅप्टिकल डाटा म्हणजेच आत येणारा प्रकाश एका विशिष्ट गणनरिती (अल्गोरिदम्) मध्ये येतो. श्री. मेनन यांनी याच अल्गोरिदम् ची उकल करून (डीकोड करून) त्याला एका सॉफ्टवेअर च्या समीकरणात बसवलं आहे, त्यामुळे इनपुट डाटा म्हणजेच प्रकाश म्हणजेच आपला फोटो हा डिजिटल भाषेत (कोड मध्ये) रूपांतरित केला जाईल. सुरवातीला जरी हे तंत्र अल्प विकसित असलं, तरी भविष्यात ह्याचं मोठं स्वरूप आपल्याला बघायला मिळेल.
या प्रकल्पावर काम करणारे वैज्ञानिक या तंत्राच वापर हे रोड नेवीगेशन सिस्टीम, आणि सर्विलांस सिस्टीम मध्ये करू इच्छितात. पण कदाचित भविष्यात आपल्याला एखादा मिरर लेस आणि आॅप्टिकलेस कॅमेरा बघायला मिळू शकेल. आणि हो, तो DSLR तंत्राचा अंत असेल. कारण DSLR मधला लेन्स फॅक्टर हा नाहीसा झालेला असेल!

*आॅप्टिकलेस हे तंत्र Canon कंपनीने फार आधीच विकसित केले असावे अशी माझी एक भाबडी समजूत आहे. कारण Canon चे पेटंटेड DLO तंत्रज्ञानाचं प्राध्यापक मेनन यांच्या तंत्रज्ञानाशी बरचसं साधर्म्य आहे. कदाचीत व्यावसायिक अडचणींमुळे त्यांनी ते उघड केलं नसावं. DLO विषयी सविस्तर माहिती देईनच.

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

3 Comments

  1. खुप छान व सुंदर माहिती
    धन्यवाद अशा प्रकारची नवनवीन अपडेट दिल्याबद्दल

    DILIP GOTE
    1. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close