ट्रायपॉड खरेदी करताना योग्य ट्रायपॉड कुठल्या निकषांवर खरेदी करायचे हेच अनेक लोकांना माहीत नसते. ट्रायपॉड असायला हवे म्हणून एक ट्रायपॉड खरेदी केले जाते की जे आपल्या मित्रा जवळ आहे, आपल्या खिशाला परवडणारे आहे, जे आपल्या कॅमेऱ्याचा भार पेलू शकते. या पलीकडचे निकष आपणास माहितीच नसतात. आज त्यावर “फोकस” करू..
1. वजन पेलण्याची क्षमता
तुमचे ट्रायपॉड तुमच्या लेन्स, फ्लॅश आणि अन्य उपकरणांसह कॅमेऱ्याचे वजन पेलू शकते का?
2. साईझ
ट्रायपॉड फोल्ड केल्यानंतर किती कमी आणि ट्रायपॉड अन्फोल्ड केल्यानंतर किती जास्त उंची होते हे बघावे. ट्रायपॉड चा फोल्ड केल्यानंतर चा मोठा आकार ट्रायपॉड हाताळण्यासाठी अडचणीचा ठरतो.
3. हेड
तुम्हाला हवे असलेले हेड ट्रायपॉड वर माऊंट करू शकतो का? हेड अनेक प्रकारचे असतात, उदा. बॉल हेड (360° मध्ये फिरू शकते), पॅन हेड (पॅनींग साठी वापरला जातो) इत्यादी.
4. सेगमेंट
ट्रायपॉड चे पाय किती सेगमेंट चे आहे? साधारणतः 3 ते 4 सेगमेंट असतात.
5. सेगमेंट कनेक्टर
सेगमेंट चे कनेक्टर कोणत्या पद्धतीचे आहे? लॉक टाईप की थ्रेड टाईप की फोल्ड टाईप.
6. वॉटर लेव्हल
वॉटर लेव्हल हे ट्रायपॉड समतल आहे की नाही हे बघण्यासाठी वॉटर लेव्हल चा वापर होतो. वॉटर लेव्हल दोन प्रकारचे असतात, ड्रम टाईप किंवा डिस्क टाईप.
7. फोल्डिंग अँगल
ट्रायपॉड चा फोल्डिंग अँगल किती? जास्त मोठा कोन, अधिक चांगला ट्रायपॉड.
8. वजन
कमी वजन म्हणजे चांगला ट्रायपॉड
9. ट्रायपॉड चे मटेरियल
कुठल्या मटेरियल ने ट्रायपॉड बनला आहे? कमी वजनाचे, मजबूत, कमीत कमी कंपन उत्पन्न करणारे मटेरियल हे उत्तम. सध्या कार्बन फायबर हे ट्रायपॉड साठीचे सर्वोत्कृष्ट मटेरियल मानले गेले आहे.
10. ग्रीप
ट्रायपॉड च्या पायांची ग्रीप, आणि हॅण्डल ची ग्रीप कशी आहे ते पाहावे.
11. वेट हूक
अतिरिक्त स्टाबिलिटी साठी कधी कधी अतिरिक्त वजन ट्रायपॉड ला जोडावे लागते, त्यासाठी आवश्यक असलेले हूक आहे की नाही.