fbpx

ऑफसिझन मध्ये घरबसल्या कमवा.. 2

वेडिंग सिजन असताना आपल्याला वेळ पुरत नाही, आणि ऑफसिझन मध्ये वेळ जात नाही, ही अवस्था बऱ्याच फोटोग्राफर्स ची असते. खूप कमी फोटोग्राफर्स असे आहेत की जे ऑफसिझन मध्ये चालणारे पोर्टफोलिओ, प्रोडक्ट फोटोग्राफी इत्यादी कामे करतात. काही फोटोग्राफर्स इतर जोडधंदे म्हणजे गिफ्ट आर्टिकल प्रिंटिंग, आयडी कार्ड प्रिंटिंग करतात. तर काही फोटोग्राफी कार्यशाळा किंवा स्वतः सराव करतात. ही सगळी कामे करत असताना आपण आणखी एक काम करू शकतो. ते म्हणजे आपण काढलेल्या फोटोज् ना, व्हिडिओ ला मॉनेटाईझ करून!

मॉनेटाईझ करणे म्हणजे काय, तर आपल्या कामांपासून आर्थिक उत्पन्न मिळविणे. ते कसं हे जाणून घेऊ. ह्यात फोटो आणि व्हिडीओ हे दोन वेगळे प्रोडक्ट म्हणून विचार करू, कारण दोहोंचा ग्राहकवर्ग, आणि कंझंप्शन पद्धत निराळी आहे.

स्टॉक फोटो

स्टॉक फोटो म्हणजे आपण काढलेले कुठल्याही विषयाचे, कुठल्याही पद्धतीचे फोटोग्राफ्स एजन्ट मार्फत विकणे. थोडक्यात तुमच्याकडे वरातीत नाचणाऱ्या घोड्याचे फोटो आहे, आणि त्याचे सर्व प्रकाशन आणि कॉपीराइट हक्क तुमच्याकडे आहेत, तर त्या फोटोची विक्री किंमत ठरवून तो फोटो तुम्ही एजन्ट कडे हस्तांतरित करू शकता. समजा एखाद्या वृत्त पत्र, मासिक, किंवा जाहिरात कंपनीला तशाच एका फोटोची आवश्यकता असेल तर ते तो फोटो एजन्ट कडून विकत घेऊ शकतात. अर्थात एजन्ट त्यात आपला नफा जोडतो. स्टॉक फोटो विक्री व्यवसाय हा तसा जुना, पण आता साधारण १० वर्षांपासून तो ऑनलाईन झाला आहे आणि दिवसेंदिवस त्याच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. स्टॉक फोटोज् अगदी 25 सेंट्स (~17.50 रुपये) पासून तर काही हजार डॉलर्स पर्यंत विकले जातात.) माझ्या एका मित्राने प्राणी संग्रहालयात गेले असता सहज म्हणून काढलेला सिंहाचा फोटो त्याने 150 डॉलरला विकला होता! त्या किमतीत एक चांगली लेन्स किंवा अन्य अक्सेसरि तुम्ही विकत घेऊ शकता!

आपले फोटो स्टॉक फोटो म्हणून विकताना कुठल्याही कॉपीराइट हक्काचे भंग होणार नाही, अथवा कुणाचही खाजगी जीवन सार्वजनिक होणार नाही ह्याची दक्षता आपण घ्यावी.

काही ऑनलाईन स्टॉक फोटो एजंसी च्या वेबसाईट सोबत देत आहे.

  1. http://www.shutterstock.com
  2. http://www.gettyimages.in
  3. http://www.istockphoto.com

व्हिडिओ मॉनेटाईझेशन

आपण आपले व्हिडिओ युट्यूब आदी वेबसाईट वर अपलोड करतो. आपले चॅनल मॉनेटाईझ करण्याची मुभा युट्यूब आपल्याला देतो. ह्या प्रकारात आपल्या व्हिडिओ मध्ये जाहिराती दाखवल्या जातात, प्रत्येक हिट प्रमाणे जाहिरातीचे पैसे आपल्या खात्यात जमा होत जातात.

नियमित जर आपण अधिकाधिक फोटोज् आणि व्हिडिओज आपण अपलोड केलेत तर ह्यापासून उत्पन्नाची शक्यता अधिक होत जाते. आणि फावल्या वेळात काढलेले, अल्बम दृष्ट्या कमी महत्वाचे काम देखील कमाई देऊन जाते!

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव

2 Comments

  1. Right thinking 👌 👍 👍 I’m unknown this information, very good thing. ………….

    Shivaji S.jagtap

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close