July182019
कुठलाही प्रोफेशनल फोटोग्राफर फुल फ्रेम कॅमेरा विकत घेतो ते केवळ त्याला फुल फ्रेम चा रिझल्ट मिळावा, किंवा चार चौघात शोबाजी करून शेखी मिरवण्यासाठी म्हणून नव्हे. तर आपण खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा सदुपयोग व्हावा, आपल्या कॅमेऱ्याने उत्तमोत्तम फोटोज् तर घ्यावेच पण आपण तांत्रिक दृष्ट्या एक सर्वोत्तम वस्तू हाताळतो याचा सार्थ समाधान मिळावा म्हणून, कॅमेऱ्याच्या रिझल्ट बरोबरच कॅमेऱ्याचा दणकट पणा, मजबुती, इत्यादी देखील महत्त्वाचे असतात. विशेषतः जे अगदी विषम वातावरणात, परिस्थितीत काम करतात त्यांच्यासाठी. Nikon ने 2017 साली D850 हा फुल फ्रेम कॅमेरा लाँच केला. साधारण ₹250000 चा हा कॅमेरा त्याच्या दमदार 45.7MP सेन्सर व्यतिरिक्त त्याच्या व्हेदर सिल्ड डिझाईन साठी प्रसिद्ध आहे. Nikon ने नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्यात D850 च्या अनेक चाचण्या दाखविल्या आहेत. अति शित, ते अति उष्ण, पाऊस असो वा वारा, धूळ असो किंवा कॅमेऱ्याची आघात सोसण्याची क्षमता. या साऱ्या बाबींचा Nikon ने कसा सखोल विचार केला आहे हे ह्या व्हिडिओत दिसून येईल. ©सर्व Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Leave a Reply