fbpx

जागतिक फोटोग्राफी दिवस आणि फोटोग्राफी चा इतिहास.. 2

आज 19 ऑगस्ट, जागतिक फोटोग्राफी दिवस! पण आजच का? कारण 1837 साली फ्रेंच तंत्रज्ञ Louis Daguerre आणि Joseph Nicephore Niepce यांनी Daguerreotype फोटोग्राफी प्रोसेस चा शोध लावला व त्याचे पेटंट घेतले. ही प्रोसेस म्हणजे फोटो आयन ने तांब्याच्या प्लेटवर ज्याला चांदीचा मुलामा दिला आहे छायाचित्र ठसविले गेले. हे पहिले प्रिंटेड छायाचित्र मानले जाते जे दीर्घकाळर्यंत टिकते. फ्रेंच सरकारला ते पेटंट उपयोगी वाटले म्हणून त्यांनी ते विकत घेतले, व काही दिवसातच 19 ऑगस्ट 1939 साली ते सामान्य जनतेसाठी खुले केले. पेटंट खुले केले गेल्यापासून फोटोग्राफी क्षेत्राची झपाट्याने प्रगती झाली. तेंव्हा पासून हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो.

हा दिवस जरी फोटोग्राफी च्या दृष्टीने अतिमहत्वाचा असला तरी फोटोग्राफी विज्ञानाचा, तंत्राचा आणि त्याच्या विकासाचा इतिहास खूप जुना आहे. फोटोग्राफीच्या जन्मापासून आतापर्यंतची टाईम लाईन जरा समजून घेऊ.

अश्मयुग

Paleo-camera.com

अश्मयुगीन काही भित्तीचित्रे उलटी रेखाटण्यात आली आहेत. त्या भित्तिचित्रांच्या समोर बारीक छिद्रे असल्याचे आढळून आले आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते ही चित्रे छिद्रातून आलेल्या प्रकाशाच्या मदतीने रेखाटली असावीत. ह्याचा सबळ पुरावा नसल्याने हा कालखंड फोटोग्राफी च्या इतिहासात ग्राह्य धरत नाही.

इसवी सन पूर्व 470

http://www.cameraobscura.nz

एखाद्या बंदिस्त खोलीतून एखाद्या छोट्या छिद्रा द्वारे प्रकाश आत येऊ दिल्यास, प्रकाश स्त्रोत येत असलेल्या खोलीतील सर्व हालचाली बंदिस्त खोलीच्या भिंतीवर अपसाइड डाऊन (उलट्या) दिसतात. असे निरीक्षण चिनी तत्वज्ञ मोझी याने नोंदविले. त्याच्या शिष्याने त्यावर प्रयोग करत प्रकाश एका सरळ रेषेत प्रवास करतो हे समजून भिंग वापरून त्यावर विविध प्रयोग केले. हे तंत्र पुढे ग्रीक विद्वानां पर्यंत पोहोचले. त्यांनी ह्या तंत्राला कॅमेरा ओबस्क्युरा हे नाव दिले.

ई.सन 1031 ते 1095

openminds.tv

चिनी वैज्ञानिक शेन कुओ यांनी कॅमेरा ओबस्कुरा संबंधित अनेक गणितीय आणि भौमितिक सिद्धांत मांडले.

इसवी सन 1300

इंग्लिश खगोल तज्ज्ञ रॉजर बेकन ने कॅमेरा ओबस्क्युर वापरून सुरक्षित रित्या सूर्यग्रहण बघितल्याचे नोंदविले आहे.

इसवी सन 1604

जोहानस केप्लर याने आपल्या परालीपोमेना ग्रंथामध्ये कॅमेरा वापरा बद्दल अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत.

इसवी सन 1825

Wikipedia

फोटोग्राफीचा जनक जोसेफ निसेफर या फ्रेंच शास्त्रज्ञाने आधुनिक छायाचित्रणाची पाहिली पायरी मानली गेलेल्या हेलियोग्रफी चा शोध लावला. या तंत्राचा वापर करून त्याने जगाला माहित असलेले पहिले छायाचित्र काढले.

Wikipedia

इसवी सन 1839

19 ऑगस्ट 1939 साली ते सामान्य जनतेसाठी खुले केले. पेटंट खुले केले गेल्यापासून फोटोग्राफी क्षेत्राची झपाट्याने प्रगती झाली. तेंव्हा पासून हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो.

इसवी सन 1861

Edinphoto

तीन वेगवेगळ्या ब्लॅक अँड व्हाईट प्लेट्स वर प्रकाश स्पेक्ट्रम वापरून टारटन रिबन नावाचे पहिले रंगीत छायाचित्र घेण्यात आले.

इसवी सन 1878

Fine art america

एका पैंजेची शहनिषा करताना, घोड्याचे चारही पाय पाळताना काही क्षण तरी हवेत असतात हे सिद्ध करण्यासाठी पहिले हायस्पीड फोटो घेण्यात आले. हा फोटो एडवर्ड मुयब्रिज यांनी तारांचा वापर करून घेतला होता.

इसवी सन 1920

Wikipedia

Kodak कंपनीचा ब्राऊनी कॅमेरा बाजारात उपलब्ध. कॅमेरा आता सामान्य माणसाच्या हातात.

इसवी सन 1930

Bambootrading.com

जवळपास 80% जाहिरातींमध्ये छायाचित्रांचा वापर सुरू.

इसवी सन 1963

Kodak चा सहज वापरता येण्याजोगा कॅमेरा लाँच.

इसवी सन 1975

internethistorypodcast.com

Kodak चा पहिला इलेक्ट्रॉनिक कॅमेरा लाँच. 0.1 मेगापिक्सल चे फोटो कॅसेट वर स्टोअर करणे शक्य.

इसवी सन 1980

Pinterest

Sony द्वारे स्वस्त पोर्टेबल डिजिटल कॅमेरा Mavica लाँच. पोस्ट प्रोसेसिंग सॉफ्टवेअर द्वारे एडिटिंग करणे शक्य. टीव्ही कनेक्टिव्हिटी शक्य.

इसवी सन 1986

TIF फॉरमॅट चा जन्म

इसवी सन 1990

Adobe Photoshop 1.0 रिलीज

इसवी सन 1991

Canon चा 1.3 MP क्षमता असलेला जगातील पहिला कमर्शिअल कॅमेरा EOS1 लाँच.

इसवी सन 1992

नासा द्वारे CMOS सेन्सर ची निर्मिती. JPEG forma अस्तित्वात आले.

इसवी सन 2000

Sharp कंपनीद्वारे 1MP क्षमता असलेला पहिला कॅमेरा फोन बाजारात.

इसवी सन 2007

Canon द्वारे 50MP 5Ds कॅमेऱ्यांची निर्मिती.

वरील माहिती विविध स्रोतां द्वारे संकलित केली आहे. त्यातील बरीच माहिती http://www.sumbaran.com (वेबसाइट आता बंद आहे.) वरून घेतली आहे.

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

2 Comments

  1. Very nice infomation

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close