आफ्रिकेतील बोत्सवाना च्या जंगलात सिंहाच्या कळपाचा फोटो शूट करत असताना फोटोग्राफर कडून कॅमेरा ट्रायपॉड वरून चुकून निखळला. सिंहीणीला चाहूल लागताच ती कॅमेऱ्या पर्यंत पोहोचली. आणि तिला तिच्या पिल्लांसाठी एक नवं खेळणं सापडलं..नव्या खेळण्यासाठी पिल्लांमध्ये भांडणे सुरू झालीत. त्यांनी कॅमेरा लेन्स दातांमध्ये पकडून एकमेकांकडून हिसकावून घेण्यास सुरुवात केली..फोटोग्राफर बार्बरा जेन्सन वोरस्टर यांनी हा सगळा प्रकार आपल्या दुसऱ्या कॅमेऱ्याने टिपला..खेळून झाल्यानंतर कळपाने तो कॅमेरा तिथेच सोडून दिला. फोटोग्राफर च्या सहकाऱ्यांनी तो पुन्हा मिळवला. त्यावर सिंहांच्या दातांचे ठसे पडून बॉडी आणि लेन्स जरा खराब दिसू लागली, पण कॅमेरा किंवा लेन्स पूर्वी प्रमाणेच ऑपरेट होत होती. बार्बरा बाईंनी कॅमेरा आणि लेन्स वरील डाग, या घटनेची आठवण म्हणून तसेच ठेवले आहेत..