fbpx

कॅमेऱ्या सोबत स्वतःला देखील अपग्रेड करा.. Leave a comment

आपल्याला चांगले क्लायंट मिळावे, चांगला नफा मिळावा, त्या क्लायंट च्या असाईंमेंट च्या रेफरंस ने आणखी दोन चांगले क्लायंट मिळावेत ही प्रत्येक फोटोग्राफर ची अपेक्षा असते. त्यासाठी आपण आपले इक्विपमेंट्स अपग्रेड करत असतो. फोटोग्राफी कौशल्य अपग्रेड करत असतो. चांगले क्लायंट आपल्यापर्यंत यावेत यासाठी धडपडत असतो.

पण एक चांगला फोटोग्राफरने आपल्या लग्नकार्यात शुट करून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, त्यात सर्व अद्ययावत उपकरणांचा वापर करून (बऱ्याचदा दिखाव्यासाठी) फोटोग्राफी केली जावी ही आपल्या क्लायंट ची देखील सुप्त इच्छा असते. आणि ही इच्छा असणे हीच आपल्या यशाची किल्ली असते. ती पूर्ण करण्यासाठी आपण आपले कॅमेरे, आदी उपकरणे नेहमी अपग्रेड करतो, विविध वर्कशॉप्स मध्ये जाऊन आपले ज्ञान अपग्रेड करतो आणि त्याचा वापर करून फोटोग्राफी सुधारतो. पण या अपग्रेड साखळीतला अतिमहत्वाच्या दुवा म्हणजे तुम्ही स्वतः! स्वतःला आपण कधी अपग्रेड केलंय का? होय चांगल्या ऑर्डर्स मिळविण्याकरिता स्वतःला अपग्रेड केल्याशिवाय पर्याय नाही.

स्वतःला अपग्रेड करायचे म्हणजे नेमके काय करायचे? कसे करायचे?

Adorama च्या व्हेनेसा जॉय यांच्या मते हाय एंड क्लायंट मिळविणे म्हणजे काही अगदीच अब्जाधीश क्लायंट मिळविणे असे नाही, तर आपण सध्या काम करत असलेल्या क्लायंट पेक्षा एक स्तर पुढे जाऊन काम करणे. आणि एक स्तर पुढचे क्लायंट तुम्हाला तेंव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही एक स्तर पुढे जाल.

त्यासाठी स्वतःचे राहणीमान सुधारा. ज्या स्तरातील क्लायंट आहेत त्या लग्नाला साजेसे कपडे घाला. (किमती कपडे घाला असे नव्हे तर नीटनेटके कपडे घाला.) तुमचे कार्ड, कोटेशन आदी सुटसुटीत बनवा. स्वतःची ब्रँड इमेज बनवा. म्हणजे तुम्ही स्वतः आणि तुमचे काम हे एक ब्रँड आहे, त्याची एक इमेज आहे, आणि त्याच्या प्रगतीसाठी मी स्वतः जबाबदार आहे ही भावना तुमच्यात रुजू द्या.

कधीच आपल्या क्षमते पेक्षा अधिक देण्याचे आश्वासन देऊ नका. पण जितकं आश्वासन दिलं आहे, त्यापेक्षा थोडं अधिकच डिलीव्हर करा. लक्षात असू द्या की सर्वांना सरप्राइज आवडतात!

Sharp Imaging अहदनगर आयोजित श्री. विजय शाह यांच्या वर्कशॉप मधील एक क्षण

नगर मध्ये आम्ही आयोजित केलेल्या फोटोग्राफी वर्कशॉप मध्ये Canon फोटो मेंटर श्री. विजयजी शाह यांनी सांगितल्या प्रमाणे; आपण आपल्या प्रत्येक सेवांचे मूल्य निर्धारित करून सेवेनुसार पैसे आकारा. सरसकट भाव ठरविल्याने देखील आपल्या मूल्यवर्धित सेवांविषयी गांभीर्य राहत नाही.

जी वस्तू साध्या दुकानातून स्वस्तात घेतली जाते तीच वस्तू मॉल मध्ये तिप्पट किमतीत विकली जाते. मॉल मध्ये केवळ ती वस्तू विकली जात नसून त्याठिकाणी ग्राहक हा केंद्र मानून त्याला सर्वोत्तम खरेदीची अनुभूती दिली जाते. तीच अनुभूती आपण आपल्या ग्राहकांना देऊ शकतो का हे बघावे.
शेवटी मंत्र एकच

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥

– श्रीमद् भगवद्गीता

मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. स्वतःचे पतन तर करूच नये. कारण जो स्वतःला उंच उठवतो तो स्वतःचा मित्र असतो, जो स्वतः पतनाच्या दिशेने जातो तो स्वतःचा शत्रू असतो!

– श्रीमद् भगवद्गीता

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close