बऱ्याच लोकांना कॅमेरा घ्यायचा असतो, पण फोटोग्राफीचे ज्ञान नाही. थोडेफार शिकून मग कॅमेरा घेऊ अशा विचारात असतात. किंवा बऱ्याच फोटोग्राफर मित्रांना कॅमेरा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन वर ऑपरेट करून त्याची ट्रायल घ्यायची असते, पण योग्य ती कंडीशन, योग्य ते सब्जेक्ट हाताशी नसतात. अशा वेळी फोटोग्राफी शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी Canon कॅनडा ने एक DSLR सिम्युलेटर बनवल आहे. ज्यावर कॅमेऱ्याचे सर्व फंक्शन जसे की शटर स्पीड, अपर्चर, ISO इत्यादी आपल्याला हवे तसे सेट करून मॅन्युअल मोड ची ट्रायल घेता येणे शक्य आहे.
इतकचं नव्हे तर निरनिराळ्या लाईट अॅम्बियंसेस, स्पीड आदिवर आधारित सब्जेक्ट सिम्युलेशन केलं आहे. ज्यामुळे वास्तववादी चित्र तयार होण्यास मदत मिळते. आणि तुम्ही मोबाईल अथवा कॉम्प्युटर स्क्रीनवर फोटोग्राफीचा सराव करू शकता.
ह्या सिम्युलेटर ची ट्रायल घेण्याकरिता येथे क्लिक करा.
©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.