July182019
मिररलेस कॅमेऱ्यात न्यू टेक्नॉलॉजी आहे.. मिररलेस कॅमेऱ्यात फोटो एकदम कडक येतात राव.. मिररलेस कॅमेरा लै भारी.. रोज ऐकतोय. नेमकी भानगड काय? जरा शोध घेऊयात.


photographylife.com
DSLR मध्ये व्ह्यू फाइंडर आणि लेन्स हे एकाच सरळ रेषेत नसून खाली वर असतात. ट्रॅडिशनल DSLR च्या लेन्स मधून येणारा प्रकाश (म्हणजेच इमेज) व्ह्यू फाइंडर मधून बघण्यासाठी लेंसच्या पाठीमागे, सेन्सर च्या समोर एक मिरर एका विशिष्ट कोना मध्ये बसवलेली असते. त्यावरून परावर्तित होऊन इमेज व्ह्यू फाइंडर समोर असलेल्या प्रिझम मधून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोचते. खूप किचकट मेकॅनिझम आहे ब्वा! मिररलेस कॅमेऱ्यातून ही मिरर हद्दपार करण्यात आली आहे. मिरर नाही तर प्रिझमही नाही. मिरर काढल्यामुळे लेन्स आणि सेन्सर ह्यातले अंतर कमी झाले. अंतर कमी झाल्याने लेंसचा व्यास (जाडी) कमी झाली. आणि ह्या सगळ्या बाबी लेस झाल्याने कॅमेऱ्याचे वजन आणि आकार देखील लेस झाले आहे! मिररलेस मुळे इमेज क्वालिटी प्लस झाली का? तर नाही. कारण इमेज क्वालिटी वर प्रभाव पाडू शकेल अशा कुठल्याही गोष्टीमध्ये (उदा. लेन्स, सेन्सर, प्रोसेसर) कुठलाही मूलभूत बदल केलेला नाही.
dpreview.com
तर मंडळी.. मिररलेस मधून बऱ्याच गोष्टी जरी लेस केल्या गेल्या असल्या तरी प्लस काहीच केलेले नाही. पण हो जो काही बदल केला, तो देखील इंडस्ट्री वर दूरगामी परिणाम करेल असाच आहे. भविष्य मिररलेसचचं आहे. कालांतराने सर्व इंडस्ट्री मिररलेस होणार हे सांगायला नकोच, पण आज जरी आपल्याकडे मिरारलेस कॅमेरा नसला तरी आपण मागास, किंवा कमी दर्जाचा कॅमेरा वापरत आहोत असे समजू नका!
©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

2 thoughts on “मिररलेस मध्ये काय प्लस आणि काय लेस..

Leave a Reply