Healthy CIBIL चे मंत्र

फोटोग्राफी जगतात होत असलेले नवनवीन आविष्कार, प्रयोग आणि वाढत चाललेली स्पर्धा यांमुळे रोज नवे कॅमेरे, इक्विपमेंट्स, अपग्रेड्स. लाखो रुपये खर्चून कॅमेरा घेतला तरी थांबता येत नाही. कारण लेन्स अपग्रेड करणं अजून बाकी असतं. लेन्स हातात आली, आपल्याला लाईट्स पाहिजे असतात. आणि थांबला तो संपला ह्या नियमानुसार आपण स्पर्धेचे बळी पडतो. ह्या रुक्ष स्पर्धेत मदतीचा हात म्हणून आपल्याला फायनान्स कंपन्यांची चांगली मदत होते. नगण्य रक्कम भरून, काही वेळातर अगदी १ रुपयाही न भरता आपण लाखो रुपयांची उपकरणं ही बिनव्याजी कर्जाने खरेदी करू शकतो.

फायनान्स कंपन्या उपकरणांसाठी देत असलेल्या कर्जांच्या बदल्यात कुठलेही जामीन घेत नाहीत. हमी फक्त एकच. तुमचा CIBIL स्कोअर. म्हणजेच तुमची कर्ज परतफेडीची कुवत, आणि शिस्त ह्याचा निर्देशांक. तो तुमच्या व्यावहारिक शिस्तीने कमी जास्त होत राहतो. तुमचा CIBIL निर्देशांक सुदृढ ठेवण्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे.

1. बँकेचे व्यवहार

CIBIL एजन्सी तुमच्या बँक व्यवहारावर (PAN Card द्वारे) नजर ठेऊन असते. तुमचे चेक बाऊन्स ई. सारखे पत खालविनारे व्यवहार तुमच्या खालावलेल्या CIBIL साठी कारणीभूत ठरू शकते.

2. विविध कर्जांचा परतावा

तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड वेळेवर करता की नाही, तुम्ही तुमची विविध बिले वेळेवर भरता की नाही ह्यावर देखील तुमचे CIBIL स्कोअर अवलंबून असते.

3. मिळकत कर

तुम्ही वेळोवेळी मिळकत कराचा रिटर्न (इन्कम टॅक्स रिटर्न) फाईल करता का? त्यात किती कर भरता ह्याची चिकित्सा देखील CIBIL प्रोफाईलिंग द्वारे केली जाते.

4. जामीन

तुम्ही जामीन असलेल्या व्यक्ती अथवा संस्थेची वित्तीय स्थिती, तुमच्या जॉइंट अथवा को अकाऊंट होल्डर ची वित्तीय स्थिती आणि त्याची कर्ज विषयक शिस्त ह्या गोष्टींचा देखील परिणाम तुमच्या CIBIL स्कोअर वर होतो.

5. नवीन कर्ज

नवीन कर्जासाठी वारंवार आवेदन न करता एका विशिष्ट कालावधीने पुनर आवेदन करावे.

वरील सर्व बाबी समजावून घेऊन त्या काटेकोरपणे पाळल्यास तुम्हाला तुमचे CIBIL स्कोअर हे सुदृढ ठेवून मोठ्यात मोठ्या रकमेचे कर्ज घेता येणे शक्य होईल. अधिक माहिती साठी डाऊनलोड करा

Sharp Imaging अहदनगर येथे विविध उपकरणे 0% व्याजदराने उपलब्ध आहेत. (बजाज फायनान्स, HDFC फायनान्स, क्रेडिट कार्ड फायनान्स) आजच 9404980133 या क्रमांकावर कॉल करून आपल्या CIBIL स्कोअर विषयी आणि कर्जविषयी जाणून घ्या! किंवा ऑनलाईन आवेदन करण्यासाठी येथे क्लिक करा.

© सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Sharp Imaging

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s