संगणक घेताना मॉनिटर निवडणे हा काही फार मोठा प्रश्न नसतो. टेबलावर फिट बसणारा, दिसायला उठावदार, आणि खिशाला परवडेल असा मॉनिटर आपण निवडतो. बरोबर ना? पण मॉनिटर घेताना काही आवश्यक गोष्टींकडे आपलं अनाहूतपणे दुर्लक्ष होतं. त्या बाबींबद्दल आज आपण जाणून घेऊ.
१. रिझोल्युशन
रिझोल्युशन म्हणजे स्क्रीन वर उपलब्ध असणाऱ्या एकूण आडव्या आणि उभ्या पिक्सेल ची संख्या. ही जितकी जास्त तितकी क्लियारिटी जास्त, आणि डोळ्यांवर कमी ताण!
- HD : 1280 X 720
- FHD : 1080 X 1020
- QHD : 2560 X 1440
- UHD : 3840 X 2160
- 4K : 4096 X 2160+
२. व्युव्हींग अँगल
डाव्या उजव्या किंवा वरून खालून कुठल्याही अँगलने जास्तीत जास्त बघता येण्याची क्षमता. IPS पॅनल मध्ये साधारणतः 178° पर्यंत बघता येणे शक्य असते.
३. कॉन्ट्रास्ट रेशो
स्क्रीनवर अधिकाधिक काळया आणि अधिकाधिक शुभ्र रंगछटा मधील फरक म्हणजेच कॉन्ट्रास्ट रेशो होय. अधिक कॉन्ट्रास्ट रेशो म्हणजे जास्त डिटेल्स, आणि क्रिस्पी इमेज!
४. रिफ्रेश रेट
प्रति सेकंद स्क्रीनवर एखाद्या इमेजचे रंग पुनर्निर्मिती दर म्हणजे रिफ्रेश रेट. हर्ट्झ (Hz) हे त्याचे परिमाण. उदाहरणार्थ 60Hz रिफ्रेश रेट असलेला मॉनिटर वर एका सेकंदात 60 वेळा रंगांची पुनर्निर्मिती करण्याची क्षमता असते. जास्त रिफ्रेश रेट असलेल्या मॉनिटर वर व्हिडिओ अगदी क्रिस्पी आणि स्मुथ दिसतात.
५. अँम्बीयंट लाईट सेन्सर
अँम्बीयंट लाईट म्हणजे ज्या ठिकाणी आपण मॉनिटर वापरणार आहोत तेथे उपलब्ध असलेला नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाश. हे सेन्सर मॉनिटर च्या आसपासची लाईट समजून घेऊन मॉनिटर ची ब्राईटनेस त्याप्रमाणे अॅडजस्ट करतो. त्यामुळे अधिक वेळ काम करून देखील डोळ्यांवर ताण पडत नाही.
विविध प्रकारचे मॉनिटर्स Sharp Imaging अहदनगर येथे उपलब्ध आहेत. संपर्क 09404980133.
© सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.