fbpx

जादूची पुडी : सिलिका जेल Leave a comment

कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कापडी किंवा स्पंज च्या वस्तू, कातडी वास्तूच्या बॉक्स मध्ये हमखास आढळणारी, उपयुक्त पण तिच्या बद्दल असलेल्या अज्ञानामुळे अतिदुर्लक्षित वस्तू म्हणजे सीलिका जेलची एक छोटीशी पुडी.

सोडियम सिलिकेट च्या स्फटिक पासून बनलेल्या ह्या जेलच्या बारीक खड्यांचे वैशिष्टय म्हणजे हे स्फटिक वाजनाला हलके व सरंध्र (porous) आहेत. सिलिका जेलमध्ये आपल्या वजनाच्या ४०% पर्यंत आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते.

इलेक्ट्रॉनिक उपकरण, कातडी वस्तूंना अर्दृतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या वस्तूंच्या पॅकिंग मध्ये सिलीका जेलच्या पुड्या ठेवल्या जातात. ह्या पुड्या टिश्श्यु पेपर सारख्या सरंध्र कागदापासून बनविलेल्या असतात ज्यामुळे वातावरणातील हवा सीलीका जेल पर्यंत पोहचेल. बॉक्स मधील उपकरणे ही बव्हंशी एअर टाईट मटेरियल ने रॅप केलेली असतात, व बॉक्स मध्ये असलेली सिलिका जेल अतिरिक्त आर्द्रता काही प्रमाणात शोषून घेऊन आपल्या महागड्या उपकरणांचे, वास्तूंचे संरक्षण करते. ज्या बॅगमध्ये आपण आपली डिजिटल उपकरणे कॅरी करतो त्या बॅग मध्ये सिलिका जेल ची पुडी ठेवल्यास आपल्या उपकरणांचे आयुर्मान वाढेल. पण, कॅमेरे व इतर उपकरणे ह्यात काही फरक आहेत. कॅमेरा हा उच्च प्रतीच्या कोटेड एलिमेंट जोडून बनविलेला असतो. ह्या लेन्सेस वर वातावरणातील आर्द्रता आणि प्रदूषणाचा परिणाम होऊन लेन्सेस वर बुरशी जमते, कचेवरच्या कोटिंगची झीज होते.

जेल ची छोटी पुडी आर्द्रता काही प्रमाणात शोषून घेऊ शकते पण पावसाळ्यात, हिवाळ्यात वाढलेल्या आर्द्रते ला थोपविने सिलिका जेलला शक्य होत नाही. वातावरणातील अतिरिक्त आर्द्रता थोपविण्यासाठी ड्राय कॅबिनेट मध्ये कॅमेरे व लेन्सेस ठेवणे हेच योग्य. ड्राय कॅबिनेट एक विद्युत संचालित निर्वात कपाट असते ज्यात एका विशिष्ठ तापमानात उपकरणे साठविली जाऊ शकतात. ही ड्राय कॅबिनेट वेगवेगळ्या सायझेस मध्ये Sharp Imaging अहदनगर येथे उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क 09890795728

©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close