Gimbal बद्दल एक ‘संतुलित’ दृष्टिकोण..

प्रत्येक विडिओग्राफर च्या किट मध्ये गिंबल असायला हवा असे हल्ली बऱ्याचदा ऐकण्यात येते. प्री वेडिंग व्हिडिओ शुट चा वाढता क्रेझ, जेथे एका विडिओग्राफर ला आपला कलाविष्कार सादर करण्याची संधी मिळते, हे गिंबल हवा हवासा वाटण्याचं एक मुख्य कारण. प्रीवेडींग च्या क्षेत्रात फोटो आणि व्हिडिओग्राफीचा चांगलाच कस लागतो. रोज नवनवे प्रयोग ह्या क्षेत्रात पहावयास मिळतात. ह्या क्षेत्राची एकंदर व्याप्ती आणि त्यातून फोटोग्राफर ला मिळणारे उत्पन्न हे दिवसेंदिवस वाढतच आहे! प्रिवेडिंग च्या विडिओला अधिक सिनेमॅटिक बनविणाऱ्या gimbal विषयी अधिक जाणून घेऊ..

Gimbal काय आहे?

गिंबलचा इतिहास धुंडाळत असताना gimbal हा काही नवीन प्रकार नाही असे लक्षात येते. ख्रिस्तपूर्व काळात एका ग्रीक विचारवंत आणि लेखकाने दौतीमधून शाई सांडू नये म्हणून gimbal वापरल्याचे सापडते. सन 200 च्या आसपास चीनमध्ये देखील gimbal तंत्राच्या वापराच्या पाऊलखुणा आढळतात. इंडस्ट्रियल एज मध्ये युरोपियन नाविक gimbal च्या मध्ये होकायंत्र ठेवून नौकानयन करत. तेच तंत्र पुढे विमानात वापरण्यात आले.

परस्पर विरुद्ध अक्षांमध्ये 3 कड्या एकमेकांत अशा प्रकारे गुंतविल्या जातात की जेणेकरून सर्वात मधल्या कडीच्या विरूद्ध अक्षात ठेवलेली वस्तू ही सदैव स्थिर राहील. त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी बदलणार नाही.

सध्या हेच तंत्र वापरून फोटोग्राफी gimbal बनवले गेले आहेत. गिंबलचा उद्देश कॅमेरा कुठल्याही अक्षात स्थिर ठेवणे आहे. Gimbal वापरून तुम्ही तुमच्या विडिओग्रफिला अधिक प्रभावी बनवू शकता.

आपल्या किट मध्ये एक सर्वोत्तम gimbal असावा ह्यावर सर्वच विडिओग्रफार्स लक्ष असते. आणि त्यासाठी अगदी 60 ते 70 हजार रुपये खर्चायची देखील त्यांची तयारी असते. पण ह्याची दुसरी बाजू पाहता गिंबल विकत घेताना काही गोष्टींचा आपण आवर्जून विचार करावा असे मला वाटते.

तांत्रिक बाबी:

1. Gimbal ची पेलोड (वजन धारण करण्याची) क्षमता ही आपल्या कॅमेऱ्याच्या आणि लेन्सेस च्या वजनाला पेलण्यास योग्य आहे.

2. Gimbal आपले मुख्य काम, म्हणजेच कॅमेरा स्टेबल ठेवण्याचे काम सर्व परिस्थितीत योग्यपणे करतो.

3. पूर्ण भार पेलल्यानंतर देखील gimbal ची सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी बदलत नाही.

4. Gimbal ची ग्रीप उत्तम आहे की नाही.

5. Gimbal चे कंट्रोल हे आपल्या कॅमेरा सोबत व्यवस्थित काम करतात.

6. Gimbal कंट्रोल ने आपला कॅमेरा तत्काळ नियंत्रित होतो की नाही.

7. एक gimbal अनेक पद्धतीने वापरता येतो. उदाहरणार्थ एका हाताने, दोन्ही हाताने, अप साईड डाऊन ई. आपला gimbal ह्या क्षमतेचा आहे का?

व्यावसायिक बाबी:

1. आपल्या संपूर्ण व्हिडिओ मध्ये gimbal वापरून शुट केलेली क्लिप किती वेळ चालणार आहे? उदाहरणार्थ 7 ते 10 मिनिटांच्या कलीपमध्ये gimbal वापरून शुट केलेला व्हिडिओ केवळ 30 ते 60 सेकांदांचाच असतो.

2. आपला प्रायमरी कॅमेरा आणि अक्सेसरी ह्यांच्या किमतीचे प्रमाण कसे असावे हे आपण निश्चित करावे. म्हणजेच मुख्य कॅमेरा 1.5 ते 2 लाखांचा, सेकंडरी कॅमेरे 1 लाखा पर्यंतचे, gimbal 70 हजाराचे, लाईट्स आणि अन्य अक्सेसरिज 1 लाखांचे!
3. Gimbal ला पुनःविक्री किंमत (resell value) कीती मिळू शकते.

वरील सर्व बाबींचा विचार केल्यास कोणता gimbal घ्यावा ह्या निर्णयावर येण्यास तुम्हाला मदत होईल.

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Sharp Imaging

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s