युजर मॅन्युअल: फोटोग्राफरची गीता

कुठल्याही सैनिकाला प्रशिक्षित करण्यापूर्वी त्याला त्याच्या शास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक असते. शास्त्राचा वापर शिकवण्यापूर्वी त्याला हे शिकवले जाते की हे शस्त्र तुझ्या शरीराचा अविभाज्य अंग आहे. ज्यावेळेला शस्त्र आणि शरीर हे एकच आहे असे तो समजतो, त्याचवेळी तो शस्त्राचा वापर करायला शिकतो. म्हणूनच शास्त्रांना इंग्रजीत आर्म असे म्हटले जाते.

आपल्या कॅमेराच ही अगदी तसंच आहे. जोपर्यंत आपण आपल्या कॅमेरा ला आपल्या शरीराचा अविभाज्य घटक म्हणून मानत नाही, जोपर्यंत आपण आपल्या कॅमेऱ्याला ओळखत नाही तोपर्यंत आपली फोटोग्राफी बहरूच शकत नाही. आपल्या कॅमेराला ओळखण्याचं सर्वात उत्कृष्ट साधन म्हणजे आपल्या कॅमेरा सोबत आलेले युजर्स मॅन्युअल!

दुर्दैवाने आपण आपल्या कॅमेऱ्यात युजर्स मॅन्युअल हे कधीच वाचत नाही. एकदा का कॅमेरा अनबॉक्स केला की कॅमेराच्या बॉक्स सोबत आपण त्याचे युजर्स मॅन्युअल देखील त्याच बॉक्समध्ये सोडून देतो, ते परत कधीही न उघडण्यासाठी. सामान्यतः याचा कारण हेच असतं की “मला कॅमेराचा संपूर्ण ज्ञान आहे” असा समज असणे, किंवा बऱ्याचदा युजर मॅन्युअल काळ्या आणि पांढऱ्या कागदावरच काहीतरी गूढ आणि निरस साहित्य आहे, ज्यात रंगीबिरंगी चित्रांची कमतरता असते. परंतु त्याचा वापर कॅमेरा समजून घेण्यासाठी असतो, त्यात रंगीत चित्रांचा ग्राफिक्स चा असलेला अभाव हा काही त्याला सोडून देण्याचा कारण नसतं. किंवा आपल्याला फोटोग्राफी येते असं समजून जर अापण मॅन्युअल वाचणे सोडत असू तर लक्षात असू द्या, जगातले मोठ्यात मोठ्या फोटोग्राफर्स देखील युजर्स पूर्णपणे वाचल्याशिवाय कॅमेरा मध्ये बॅटरी सुद्धा माऊंट करत नाहीत!

एका एका छोट्याशा डिवाइस मध्ये फीचर्सचा होत चाललेला भडीमार हासुद्धा युजर मॅन्युअल कंटाळवाणे होण्याचा मोठा कारण बनत चालला आहे. जाडजुड असा युजर मॅन्युअल वाचायला थोडा कठीणच वाटतो. परंतु हल्ली सर्वच कंपन्या आपले मॅन्युअल डिजिटल फॉरमॅट मध्ये सुद्धा बनवत आहेत. त्यांच्या वेबसाईटवर आपण डाउनलोड करू शकतो. हल्लीचे ई मॅन्युअल्स हे रंगीत चित्रांचा वापर करून बनवलेले असतत. आज-काल त्यात ॲनिमेशन चाही वापर केलेला आढळतो. युजर मॅन्युअल वाचताना शक्यतो दिलेल्या क्रमानेच वाचावा. त्याची अनुक्रमणिका आधी आवर्जून वाचावी. वेळोवेळी मॅन्युअल ची उजळणी करावी. या उजळणी मुळे तुमच्या कॅमेरा वरची तुमची पकड अधिकच घट्ट होईल!

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Sharp Imaging

2 thoughts on “युजर मॅन्युअल: फोटोग्राफरची गीता

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s